मनोज जरांगे… हीच आहे का तुमच्या शांततामय आंदोलनाची व्याख्या? गाड्यांच्या तोडफोडीनंतर सदावर्ते भडकले

Gunratna Sadavarte  : काही दिवसांपूर्वी वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढत असलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना अटक करण्याची भाषा केली होती. यामुळे मराठा समाजात गुणरत्न सदावर्तेंबद्दल रोष होता. त्या रागातूनच गुरुवारी सकाळी काही आंदोलकांनी सदावर्ते यांच्या गाडीच्या काचा फोडल्याचा प्रकार घडला आहे. गुणरत्न सदावर्ते मुंबईतल्या हिंदमाता परिसरातल्या क्रिस्टल टॉवर्स या १६ मजली इमारतीत राहतात. याठिकाणी हा प्रकार घडला.

दरम्यान, यासंदर्भात गुणरत्न सदावर्तेंनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी अनेक गंभीर आरोप गुणरत्न सदावर्तेंनी मराठा आंदोलक आणि मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर केले आहेत. तसेच, मनोज जरांगेंनी तातडीनं अटक करावी, अशी मागणीही यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.

सदावर्ते म्हणाले की,हल्लेखोरांना आणि मनोज जरांगेंना मला प्रश्न विचारायचाय. हीच आहे का तुमच्या शांततामय आंदोलनाची व्याख्या? मला सायलेंट केलं जाऊ शकत नाही, मी या भारताचे जे पिलर असतात 50 टक्के जागांचा, ज्या खुल्या वर्गासाठी जागा असतात, त्या वाचवण्यासाठी माझा लढा आहे. या देशाला जातीत जातीत न तोललं जावं, तर गुणवत्तेत तोललं जावं, यासाठी माझा लढा आहे. माझ्या कष्टाचे आणि घामाचे नुकसान तुम्ही केलं. यापूर्वी 32 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण तुम्ही केली. त्यासंबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारण नसताना कारवाई करण्यात आली. तेव्हापासूनच मला अनेक प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत.

मी थांबणार नाही, या क्षणानंतर मीसुद्धा राज्यभरातील महाविद्यालयांमध्ये जाऊन खुल्या गुणवंत विद्यार्थ्यांशी चर्चा करेल आणि मी सरकारला सांगेल, एकट्या जरांगेचं ऐकायचं नाही, आमचंही ऐकायचं आणि जरांगेंचे लाड थांबवले नाही, तर मी या क्षणापासून प्राणांतिक उपोषण करेलअसंही सदावर्ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

ऑस्ट्रेलियाच्या झंझावाती विजयाने पाकिस्तान विश्वचषकातून बाहेर जाण्याच्या मार्गावर ?

धक्कादायक ! ललित पाटीलला पुण्याबाहेर पळवण्यात ‘या’ व्यक्तीचा होता हात

इंग्लंडविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी भारतासाठी चिंता वाढवणारी बातमी, हार्दिकच्या फिटनेसबद्दल मोठी अपडेट