Shilpa Shetty & Raj Kundra: “आम्ही वेगळे झालोय”, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी घेतला घटस्फोट? चर्चेला उधाण

Raj Kundra Sparks Divorce Rumour With Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा सध्या चर्चेत आहे. राजने अलीकडेच त्याचा पहिला चित्रपट UT 69 ची (Raj Kundra Movie) घोषणा केली आहे. या चित्रपटातून राज अभिनयाच्या दुनियेत प्रवेश करणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान, राजने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. राजने सोशल मीडियावर आपण वेगळे झाल्याची घोषणा केली आहे. जरी त्यांनी या पोस्टमध्ये कोणाचाही उल्लेख केलेला नाही. यानंतर चाहते चिंतेत पडले आहेत. त्यांना वाटते की शिल्पा आणि राज वेगळे होत आहेत.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचा विवाह नोव्हेंबर 2009 मध्ये झाला होता. त्यांच्या लग्नाला 14 वर्षे पूर्ण होत आहेत. दोघेही प्रत्येक कठीण प्रसंगी एकमेकांना साथ देताना दिसतात. आता ही पोस्ट पाहून चाहते तणावात आले आहेत. तर काही लोक याला प्रमोशनल स्टंट म्हणत आहेत.

राज यांची पोस्ट व्हायरल झाली
राज कुंद्राने त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर त्यांच्या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ज्यामध्ये राज यांनी लिहिले आहे – आम्ही वेगळे झालो आहोत आणि तुम्हा सर्वांना विनंती आहे की या कठीण परिस्थितीत आम्हाला वेळ द्या. यासोबत त्याने हात जोडलेले आणि हृदयाचे इमोजी पोस्ट केले आहेत. मात्र, शिल्पाने अद्याप सोशल मीडियावर असे काहीही शेअर केलेले नाही.

महत्वाच्या बातम्या-

कंत्राटी भरतीचा निर्णय उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळातीलच – Dhananjay Munde

Mahua Moitra : अदानींना टार्गेट करण्यासाठी महुआ मोइत्राचा वापर करण्यात आला – दर्शन हिरानंदानी

चंद्रपूरच्या विकासासाठी येणा-या प्रश्नांना प्राधान्य देणार – राहुल नार्वेकर