राष्ट्रपती रामनाथ कोविंद ‘या’ दिवशी रायगडाला भेट देणार

मुंबई – देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद 7 डिसेंबरला रायगडाला भेट देणार आहेत. खासदार संभाजीराजे यांनी ही माहिती दिली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद संभाजीराजेंच्या निमंत्रणाला प्रतिसाद देत 7 डिसेंबर रोजी रायगडाला भेट देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यासंदर्भात त्यांनी एक ट्वीट केलं आहे.

राष्ट्रपतींच्या खासदार संभाजीराजेंनी ट्वीट करुन माहिती दिली आहे. संभाजीराजे ट्वीटमध्ये म्हणाले की, राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांना मी दुर्गराज रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. यास प्रतिसाद देत राष्ट्रपती महोदय दि. 7 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देत आहेत, हि आपल्या सर्वांसाठीच गौरवास्पद बाब आहे.

मराठा आरक्षणाबाबत संभाजीराजेनी शिवसेना, कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेसच्या खासदारांची भेट घेतली होती. दोन सप्टेंबर रोजी त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी राष्ट्रपतींना रायगडाला भेट देण्याचे निमंत्रण दिले होते. हे निमंत्रण राष्ट्रपतींनी स्वीकारले आहेत.