‘स्वतः पंतप्रधानांनीच भ्रष्टाचाराचा उल्लेख केल्यानंतर दोन तीन दिवसात आमचा पक्ष वेगळा झाला’, जयंत पाटलांकडून राजकीय गौप्यस्फोट

Jayant Patil: “स्वतः पंतप्रधानांनीच भ्रष्टाचाराचा उल्लेख केल्यानंतर दोन तीन दिवसात आमचा पक्ष वेगळा झाला, पक्षातील एका गटाकडून ‘त्या’ मार्गाने जाण्याचं प्रेशर होतं, पण शरद पवारांनी त्याला विरोधच केला.” आजवर समोर न आलेल्या अनेक घडामोडींचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस प्रस्तुत ‘टू द पॉईंट’ पॉडकास्टमध्ये करण्यात आला आहे. या पॉडकास्टच्या पहिल्या एपिसोडच्या भाग १ चे प्रक्षेपण आज दिनांक २२ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम व व्टिटरच्या माध्यमातून झाले आहे. पडद्यासमोर आणि पडद्यामागच्या अनेक राजकीय घडामोडी वास्तव सांगून महाराष्ट्राच्या जनतेसमोर याव्यात, राजकीय क्षेत्रातील रहस्य जनतेसमोर उलगडली जावीत याच दृष्टीकोनातून ‘टू द पॉईंट’ पॉडकास्ट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सुरु करण्यात आला आहे. पक्षातील मान्यवर लोकप्रतिनिधींसोबत खा. डॉ. अमोल कोल्हे सद्याच्या विविध राजकीय व सामाजिक घडामोडींबाबत रोखठोक चर्चा करणार आहेत.

दडपशाही महायुती सरकारच्या अक्षम्य महाराष्ट्रविरोधी कारभारावर खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्यासोबत केलेल्या सखोल चर्चेचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रस्तुत ‘टू द पॉईंट’ पॉडकास्ट एपिसोडचा पहिला भाग आज दुपारी ४ वाजता प्रसारित झाला आहे. “नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात येऊन निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचं लोकार्पण केलं. परंतु सत्य हे आहे की, निळवंडे धरणाच्या कामाला गती देण्याचं काम अडीच वर्षांच्या काळात आम्ही केलं.” निळवंडे धरणाच्या कामाची नेमकी माहिती देत आ. जयंत पाटील यांनी निळवंडे धरणाच्या कामाचे वास्तव पॉडकास्टच्या माध्यमातून सांगितले आहे.

“२०१९ ला दीड दोन दिवसाच्या सरकारच्या काळात काही प्रकल्पांना क्लीन चीट देण्यात आली” परंतु या क्लीनचीटमागचं वास्तव माननीय आ. जयंतराव पाटील यांच्याकडून भाग १ च्या पॉडकास्टमध्ये विस्तृतपणे सांगण्यात आले आहे. ज्यावेळी सत्ताधा-यांसोबत जाण्यावर चर्चा होऊ लागली तेव्हा खरी काय चर्चा झाली याविषयी माननीय आ. जयंतराव पाटील यांनी या पॉडकास्टमध्ये सांगितले आहे. माननीय आ. जयंतराव पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील नेमक्या संबंधांवरही अनेक घडामोडी खुद्द माननीय आ. जयंतराव पाटील यांच्याकडूनच ऐकता येणार आहेत. गौप्यस्फोट करणा-या राजकीय जगतातील पडद्यामागच्या अनेक घडामोडी आ. जयंतराव पाटील यांच्याकडूनच आज प्रसारित झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रस्तुत ‘टू द पॉईंट’ पॉडकास्टच्या एपिसोड १ (भाग १) स्पष्ट करण्यात आल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

जम्मू-काश्मीरमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला,4 जवान शहीद

कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा

डॉ. प्रभा अत्रे, डॉ. प्रमोद चौधरी यांना उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते मिळणार ‘अटल संस्कृती गौरव पुरस्कार’

“लोकशाही बसली धाब्यावर! हुकुमशाहीचा उदय की…”, संसदेतून १४१ खासदारांचं निलंब; तेजस्विनी पंडित संतापली