गांधी जयंतीला होणार ओबीसी जागर यात्रेचा शुभारंभ; फडणवीस, बावनकुळे यांचाही असणार यात्रेत सहभाग

OBC Jagar Yatra : संपूर्ण महाराष्ट्र भ्रमण करणाऱ्या भाजपाच्या ओबीसी जागर यात्रेचा शुभारंभ ०२ ऑक्टोबर २०२३, गांधी जयंतीच्या (Gandhi Jayanti) दिवशी करण्यात येत आहे. बापुकुटी, सेवाग्राम येथे सकाळी १०.०० वाजता नतमस्तक होऊन तसेच त्यानंतर हिंगणघाटच्या पारडी गावाजवळ ओबीसी समाजाच्या सर्व घटकांचा भव्य मेळावा आयोजित करून या यात्रेचा खऱ्या अर्थाने शुभारंभ होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवतराव कराड, महाराष्ट्रातील मंत्री, खासदार, आमदार आणि नेते मोठ्या प्रमाणात सहभागी होतील. ही यात्रा पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातील ११ही जिल्हे पादाक्रांत करेल. पहिल्या टप्प्याचा समारोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या प्रमुख उपस्थितीत पोहरादेवी, जि. वाशीम येथे होईल.

“ओबीसी जागर यात्रेची सुरुवात हिंगणघाटपासून होत असून यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, रामटेक, काटोल, अकोला, शेगाव, वाशीम असा या यात्रेचा मार्ग राहील. नवरात्रानंतर उत्तर महाराष्ट्रात ही यात्रा सुरु राहील. भाजपा सत्तेत असून राज्य सरकारने ओबीसी समाजाच्या हितासाठी ज्या योजना राबविल्यात आणि जे कार्य केले, त्याबद्दल ओबीसी समाजाला माहिती मिळावी, हा या ओबीसी जागर यात्रेचा प्रमुख उद्देश आहे. जनतेने मोठ्या प्रमाणात या यात्रेत सहभागी व्हावे आणि ओबीसींचा आवाज बुलंद करावा”, असे आवाहन भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी माजी आमदार डॉ. आशिष र. देशमुख यांनी केले आहे.

https://youtube.com/shorts/LLrVrVQpCd4?si=eqsX7Qv1NCTZNyMe

महत्त्वाच्या बातम्या-

World Cup 2023: एक असा खेळाडू, जो स्वबळावर टीम इंडियाला बनवू शकतो विश्वविजेता

Rohit Pawar : सूड कसा उगवायचा याचा निर्णय…; ‘बारामती ॲग्रो’ प्रकरणी रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Ram Satpute : लोकसभेसाठी सोलापूरमधून राम सातपुते ? शेतकऱ्यांचा, युवकांचा बुलंद आवाज आता दिल्लीत घुमणार ?