पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन खाती उघडण्यावर निर्बंध

नवी दिल्ली – रिझर्व्ह बँकेनं पेटीएम पेमेंट्स बँकेला तात्काळ प्रभावानं नवीन खाती उघडण्यास मनाई केली आहे. RBI ने पेटीएम पेमेंट्स बँकेला IT प्रणालीचे सर्वसमावेशक ऑडिट करण्यासाठी एक संस्था नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. नवीन ग्राहकांचा समावेश लेखा परिक्षकांच्या अहवालाचा अभ्यास केल्यानंतर त्यांना दिलेल्या विशिष्ट परवानगीच्या अधीन असेल असं बँकेनं एका निवेदनात म्हटलं आहे.

ही कारवाई बँकेत आढळलेल्या काही तथ्यपूर्ण पर्यवेक्षकीय मुद्यांवर आधारित आहे, असं आरबीआयने म्हटलं आहे. पेटीएम पेमेंट्स बँक ऑगस्ट 2016 मध्ये स्थापन करण्यात आली आणि मे 2017 मध्ये तिचे कार्य औपचारिकरित्या सुरू झालं.

पेटीएम पेमेंट्स बँकेने 23 मे 2017 रोजी काम सुरू केले. 9 मार्च रोजी मनीकंट्रोलने कळवले होते की विजय शेखर शर्मा यांची कंपनी पेटीएम पेमेंट्स बँक स्मॉल फायनान्स बँक (SFB) परवान्यासाठी RBI कडे अर्ज करणार आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या एका सूत्राने सांगितले की पेटीएम पेमेंट्स बँक या वर्षी जूनपर्यंत अर्ज सबमिट करू शकते. मात्र, त्याआधीच आरबीआयच्या या निर्णयाने कंपनीला मोठा धक्का बसला आहे.या प्रकरणाची माहिती असलेल्या एका सूत्राने सांगितले की पेटीएम पेमेंट्स बँक या वर्षी मे-जूनपर्यंत लघु वित्त बँकेसाठी अर्ज सादर करू शकते.  पेटीएम पेमेंट्स बँकेचे अध्यक्ष विजय शेखर शर्मा यांचा या कंपनीत ५१% हिस्सा आहे. मात्र, आरबीआयने कंपनीवर ही कारवाई का केली हे अद्याप कळू शकलेले नाही. आरबीआयने आत्तापर्यंत केवळ काही पर्यवेक्षी चिंतांमुळे हे पाऊल उचलल्याचे सांगितले आहे.