‘सत्यशोधक’ चित्रपटाला करसवलत देण्याबाबत सकारात्मक- उपमुख्यमंत्री अजित पवार

Satyashodhak :- देशात स्त्रीशिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणारे, बहुजनांसाठी शिक्षणाची दारे खुले करणारे, सत्यशोधक विचारांचे महामानव क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत ‘सत्यशोधक’ चित्रपटाला करसवलत देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेत यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिल्या.

चित्रपटांवर आकारण्यात येणाऱ्या 18 टक्के जीएसटीपैकी प्रत्येकी 9 टक्के रक्कम केंद्र आणि राज्य शासनाला मिळत असते. राज्याच्या वाट्याला येणाऱ्या रकमेची करसवलत देण्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात येणार आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचे कार्य अलौकिक असून ते भावी पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी हा चित्रपट सहाय्यभूत ठरणार असल्याने चित्रपटाला करसवलत दिली पाहिजे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, वित्त, महसूल व सांस्कृतिक कार्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

महामानवांच्या विचारावर आमच्या पक्षाची वाटचाल सुरू असून आमचे व्हिजन क्लीअर आहे – अजित पवार

‘धर्माच्या नावावर द्वेष वाढविला जात आहे, संघाच्या शाखेपासून सोशल मीडियापर्यंत जाणीवपूर्वक या गोष्टी होत आहेत’

Lahu Balwadkar | लहू बालवडकरांच्या वाढदिवसानिमित्त पार पडला ‘चैतन्यस्पर्श’ अभूतपूर्व सोहळा

“येत्या निवडणुकीत तिप्पट नगरसेवक असतील अशी ताकद समीरभाऊ तुमच्या नेतृत्वाखाली पक्षात उभी राहिली आहे”