मुरजी पटेल यांनी माघार घेतल्यानंतर ऋतुजा लटके यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, मला पोचपावती…

Andheri East Bypoll: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा भाजपने (Announce Withdraw Candidate From Andheri East Bypoll) केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी याबाबतची घोषणा केली. भाजप उमेदवार मुरजी पटेल (Muraji Patel) हे अपक्ष म्हणून देखील निवडणूक राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपकडून याबाबत आज घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानंतर आज बैठकीनंतर भाजप उमेदवार मुरजी पटेल हे माघार घेणार असल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

दरम्यान, या घडामोडींवर आता राजकीय प्रतिक्रिया येत आहेत.भाजपच्या या निर्णयाचं उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी आभार मानले आहेत. माझ्या पतीचे सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांशी चांगले संबंध होते. त्याची पोचपावती मला मिळाली आहे. त्यामुळे भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे मी स्वागत करते आणि त्यांच्या या निर्णयाबद्दल मी त्यांचे ऋणी आहे, अशी प्रतिक्रिया ऋतुजा लटके (rutuja latke) यांनी व्यक्त केली आहे.