बीसीसीआयला मिळाले नवे अध्यक्ष, विश्वविजेत्या रॉजर बिन्नी यांची नेमणूक

BCCI President: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय, BCCI) अध्यक्षपदी (BCCI President) नव्या दिग्गजाची वर्णी लागली आहे. माजी भारतीय कर्णधार आणि क्रिकेटपटू सौरव गांगुली (Sourav Ganguly) याचा कार्यकाळ नोव्हेंबर महिन्यात संपत आहे. अशात त्याच्याजागी माजी क्रिकेटपटू आणि विश्वविजेते रॉजर बिन्नी यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

‘दादा’ नंतर बोर्डाचे अध्यक्षपद बिन्नी यांच्याकडे सोपवले जाण्याच्या चर्चा होत्या. आता मंगळवारी (१८ ऑक्टोबर) मुंबईत झालेल्या बीसीसीआयच्या एजीएममध्ये बिन्नी (Roger Binny) यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे. बिन्नी यांनी भारताचा माजी कर्णधार गांगुली (Sourav Ganguly) याची जागा घेतली आहे. ते बीसीसीआयचे ३६वे अध्यक्ष ठरले आहेत.

बीसीसीआयचे नवीन पदाधिकारी:
★ अध्यक्ष: रॉजर बिन्नी
★ उपाध्यक्ष: राजीव शुक्ला
★ सचिव: जय शहा
★ सहसचिव: देवजित सैकिया
★कोषाध्यक्ष : आशिष शेलार
★ आयपीएल चेअरमन: अरुण धुमाळ