माझे वडील व्यवस्थित असते, तर मी डान्सच्या क्षेत्रात आले नसते; गौतमी पाटीलचे लक्षवेधी वक्तव्य

Gautami Patil: नृत्यांगणा गौतमी पाटील ही तिच्या डान्सव्यतिरिक्त तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत असते. आपणा सर्वांना माहिती आहे की, गौतमीची ओळख म्हणजे तिचे नृत्य. मात्र तिला नृत्य करायला किंवा या क्षेत्रात यायला कोणी भाग पाडलं? थोडक्यात तिच्या या यशाचं श्रेय कोणाला जातं? याचं उत्तर आता गौतमीने दिलं आहे.

“या यशाचं श्रेय मी वडिलांना देणार. ते व्यवस्थित असते तर मी डान्सच्या क्षेत्रात आले नसते, इथपर्यंत पोहोचले नसते. त्यामुळे मी वडिलांना व आईला श्रेय देईन. कोणत्याही मुलीला वडील असले तर ते मुलीसाठी काहीही करू शकतात. आमच्या समाजात पाटील आपल्या मुलीला कधीच डान्सच्या क्षेत्रात येऊ देणार नाही,” असं गौतमी पाटील ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

“वडिलांमुळेच मी या क्षेत्रात आले, ते व्यवस्थित असते तर माझं लग्न लावून दिलं असतं आणि माझ्या हातात आता एखादं बाळ असतं,” असंही गौतमी पाटील म्हणाली.

महत्वाच्या बातम्या-
Relationship Depression आहे खूप धोकादायक, दोन आयुष्य उध्वस्त होऊ शकतात

‘माझा विश्वास आहे की अल्लाह सर्व काही…’ वर्ल्डकप संघातून बाहेर पडल्यावर नसीम शाह भावूक

Sharad Ponkshe : ‘बाजीराव पेशवे हा छत्रपती शिवरायांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारा धुरंधर वीरपुरुष होता’