‘बंडातात्या वारकरी संप्रदयाला लागलेला डाग, तात्याला येरवड्यात उपचाराची गरज’

पुणे : साताऱ्यामध्ये बंडातात्या कराडकर यांनी वाईन विक्रीच्या विरोधात आंदोलन केलं होतं. या आंदोलनादरम्यान त्यांनी सुप्रिया सुळे तसेच पंकजा मुंडे या दारू पितात असा थेट आरोप केला आहे. सुप्रिया सुळे राजकारणात येण्यापूर्वी त्यांचे दारू पिऊन रस्त्यावर पडलेले फोटो तुम्हांला ढीगाने सापडतील असा दावा बंडातात्या कराडकर यांनी केला आहे.

साताऱ्यात बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने दंडवत दंडुका आंदोलन करण्यात आलं. यावेळी बोलत असताना बंडातात्या कराडकर यांनी नेत्यांची मुलं रस्त्यावर दारू पिऊन पडत असल्याचे पुरावे आहेत असं म्हटलं आहे.

यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी बंडातात्या कराडकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘महाराष्ट्राच्या महिला लोकप्रतीनिधी व लोकनेत्याच्या लेकींना दारू पिऊन नाचतात’ म्हणनारे बंडातात्या वारकरी संप्रदयाला लागलेला डाग आहे. तात्याला येरवड्यात उपचाराची गरज समस्त महिलांची तात्काळ माफी मागावी अन्यथा खळखट्याक अटळ आहे.’ असा घणाघात रुपाली पाटील यांनी केला आहे.