विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड तर बसलाच शिवाय मानसिक छळ झालाय; चित्रा वाघ यांनी मांडल्या परीक्षार्थींच्या व्यथा

पुणे – महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाकडून विविध पदांच्या भरतीसाठी आज आयोजित केलेल्या परीक्षा रद्द करण्यात आली आहे. काही तांत्रिक कारणास्तव परीक्षा रद्द करण्यात आली असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रात्री उशिरा एका व्हिडिओद्वारे दिली.

विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी क्षमा देखील मागितली. मात्र, अचानक परीक्षा रद्द करण्यात आल्याने तसेच रात्री उशिरा याची माहिती देण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दरम्यान, आता याच मुद्द्यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे.

 

दरम्यान, यानिमित्ताने भाजपनेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर शरसंधान केले आहे. त्या म्हणाल्या, आरोग्य खात्यानंतर आता गृहनिर्माण खात्यानं पेपर फुटीची महान परंपरा पुढे सुरू ठेवलीय… मंत्र्यांना रात्रीत पेपर रद्द करावा लागला …विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड तर बसलाच शिवाय मानसिक छळ झालाय…गावावरून हजारो रुपये खर्च करून पुणे मुंबईत आलेल्या विद्यार्थ्यांना भरपाई मिळणार का ?