Salman Khan | ‘डरना जरूरी है!’ सलमानच्या घरावर गोळीबारानंतर किरण मानेंना वेगळीच शंका; मुंबईच्या राजकारणावर मोठं भाष्य

Salman Khan | बॉलिवूडचा दबंग सलमान खानवर पुन्हा एकदा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रविवारी पहाटे 4.50 वाजता दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी अभिनेत्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर (Galaxy Apartment) गोळीबार केला. गोळीबाराच्या 5 राउंडमध्ये एक गोळी पडली. उरलेल्या 3 गोळ्या भिंतीला लागल्या आणि एक गोळी बाल्कनीच्या जाळीला छेदून घरात घुसली. मात्र, यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सलमान आणि त्याचे कुटुंब पूर्णपणे ठीक आहे. यादरम्यान अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी केलेली सोशल मीडिया पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

किरण मानेंनी पोस्टमध्ये काय म्हटलंय?
स्क्रीनप्ले…

सिनेमाच्या सुरूवातीला एकामागोमाग एक काही प्रसंग दिसतात

1

सलमान खानला (Salman Khan ) एका पक्षाचा पदाधिकारी भेटतो. मुस्लिम मतदारांना आकर्षित करून घेण्यासाठी पक्ष प्रचार करावा अशी विनंती करतो.

सलमान खान नम्रपणे नकार देतो.

कट टू

सलमान खानच्या घरावर गोळीबार होतो. बिश्नोई ‘जय श्रीराम’चा नारा देत घेतो गोळीबाराची जबाबदारी.

 

2

शिवसेनेकडून उद्धव ठाकरे लोकप्रिय नेते अमोल किर्तीकर यांची उमेदवारी जाहीर करतात.

कट टू

अमोल किर्तीकरांवर ईडीची धाड पडते.

 

3

राष्ट्रवादीकडून शरद पवार धडाडीचे नेते शशिकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करतात.

कट टू

शशिकांत शिंदेंनी एपीएमसी मार्केटमध्ये घोटाळा केला आहे त्यांची चौकशी व्हावी अशी भाजपाकडून मागणी होते.

 

4

पडद्यावर सिनेमाचं टायटल येतं

‘डरना जरूरी है !’

 

पुढे एकेक सिन्स तुम्ही वाढवू शकता.

– किरण माने

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol: “बोलायला गेलो तर खुप काही निघेल, परंतु…,” सुप्रिया सुळेंना मोहोळांनी दिलं प्रत्युत्तर

मोदीजींची गॅरेंटी म्हणजे, गॅरेंटी पूर्ण होण्याची गॅरेंटी! भाजपाच्या संकल्पपत्रावर मुरलीअण्णांची प्रतिक्रिया

Sharad Pawar: आश्वासनाची पूर्तता न करणे हे भाजपचे वैशिष्ट्य, शरद पवारांचा घणाघात