उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधव यांची ओबीसींकडे बघण्याची नीच वृत्ती दिसत आहे- Ram Satpute 

Bhaskar Jadhav vs Chandrashekhar Bawankule: उद्धव ठाकरे यांना घरकोंबडा म्हणणाऱ्या भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भास्कर जाधव यांनी चांगलेच सुनावले आहे. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी बावनकुळेंवर टीका करताना वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी तोंडावर लगाम लावावा, असे म्हटले आहे. ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान, या टीकेला आता भाजपचे आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांनी भास्कर जाधव यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. रंगरुपावरून टीका करण्याची भास्कर जाधव यांची नीच वृत्ती असल्याची टीका त्यांनी केली आहे. पुढे ते म्हणाले, उद्धव ठाकरे आणि त्यांच्यासोबत उरलेल्या लोकांचंही मानसिक संतुलन ढासळत चाललं आहे. भास्कर जाधव यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर त्यांच्या रंगरुपावरून टीका केली आहे. भास्कर जाधव यांच्या वृत्तीचा मी निषेध करतो. यातून उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधव यांची ओबीसींकडे बघण्याची नीच वृत्ती दिसत आहे. आजही भास्कर जाधव ओबीसींना अस्पृश्य मानतात का? हा माझा सवाल आहे.असं सातपुते यांनी म्हटले आहे.

पुढे ते म्हणाले, बावनकुळे साहेब यांच्या रंगरुपावर टिप्पणी करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. त्यांच्या कर्तृत्वामुळे तुमच्या आणि उद्धव ठाकरेंच्या तोंडाचा रंग उडाला आहे आणि यापुढे तुम्ही ओबीसी आणि मागास समाजाच्या रंगरुपावरून टीका केली तर समस्त ओबीसी आणि मागासवर्गीय समाज निवडणुकीत तुम्हाला बेरंग केल्याशिवाय राहणार नाही अशी घणाघाती टीका सातपुते यांनी म्हटले आहे.

https://youtube.com/shorts/Ju1y8hb1NHI?si=xISh5x2xktzYvSjN

महत्त्वाच्या बातम्या-

मन जिंकलंस..! नुकताच बाप बनलेल्या बुमराहला पाकिस्तानी गोलंदाज आफ्रिदीने दिली खास भेट

नाणेफेकीच्या ५ मिनिटांच्या आधी, ‘त्याला’ सांगितलं की..”, Rohit Sharmaचा ‘या’ खेळाडूविषयी मोठा खुलासा

विराट कोहलीचे ‘विक्रमतोड’ शतक, सचिन तेंडूलकरला मागे टाकत बनला जगातील पहिला फलंदाज