Salman Khan House Firing | “हे गृह खात्याचे अपयश..”; सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Salman Khan House Firing | बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर चार राऊंड गोळीबार करण्यात आला आहे. पहाटे 4.50 च्या सुमारास दोन अज्ञातांनी हा हवाई गोळीबार केला. दोन्ही शूटर दुचाकीवरून आले आणि चार राऊंड गोळीबार करून तेथून पळ काढला. सध्या तरी कोणी जखमी झाल्याची माहिती नाही. पोलिसांनी सलमान खानच्या (Salman Khan House Firing ) निवासस्थानी सुरक्षा वाढवली आहे. या घटनेवर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या,”गृह खात्याचे अपयश आहे”
सुप्रिया सुळे ANI सोबत बोलताना म्हणाल्या, “हे अत्यंत दुर्दैवी आहे कारण सलमान खान ज्या भागात राहतो तो भाग खूप प्रसिद्ध आहे. तिथे सकाळी लोक मॉर्निंग वॉकला जातात तसेच भाजीवाले-दुधवाले तिथे येतात, त्यांच्या सुरक्षेचं काय? हे गृह खात्याचे अपयश आहे. सलमानच्या कुटुंबावर दबाव आहे.”

“आता आपण पुण्यात आहोत आणि इथे काय चालले आहे ते आपण पाहतो, हे खूप सुशिक्षित ठिकाण आहे जिथे लोक शांततेत राहतात, पण इथेही गुन्हेगारी वाढली आहे. मी आरोप करत नसून ही भारत सरकारने महाराष्ट्रासाठी दिलेली आकडेवारी आहे.”, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

दरम्यान या गोळीबारानंतर मुंबई गुन्हे शाखेसह वांद्रे पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. याशिवाय फॉरेन्सिक टीमही तपासासाठी घटनास्थळी पोहोचली आहे. पोलिसांनी गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावलेले सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून तपास सुरू आहे. डीसीपीही घटनास्थळी पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे.

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अलीकडेच लॉरेन्स बिश्नोईने अभिनेता-गायक गिप्पी ग्रेवाल यांच्या कॅनडातील निवासस्थानावरही हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर त्याचे सलमान खानशी जवळचे संबंध असल्याचे बोलले जात होते, त्यामुळे हा हल्ला करण्यात आला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | यशाचे ‘शिखर’ गाठण्यासाठी निसर्गप्रेमींची साथ उर्जा देणारी

Sunetra Pawar: शरद पवारांनी ‘बाहेरचे पवार’ असा उल्लेख केल्याने सुनेत्राताईंना अश्रू अनावर, म्हणाल्या….

Sunil Tatkare | २०१९ पेक्षा जास्त मतदान या निवडणुकीत माझ्या अल्पसंख्याक समाजाकडून मिळेल