पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर नाशिकमध्ये शाईफेक; संभाजी ब्रिगेडचे कृत्य

पत्रकार गिरीश कुबेर

नाशिक – नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी याची जबाबदारी घेतली आहे. गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक, चुकीची माहिती लिहिल्याबद्दल शाईफेक करण्यात आल्याचे संभाजी ब्रिगेडचे नाशिक जिल्हा सचिव नितीन रोटे पाटील यांनी म्हटले.

रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला.साहित्य संमेलनाच्या मुख्य स्टेजच्या मागच्या बाजूला ही घटना घडल्याची माहिती आहे. गिरीश कुबेर यांच्यावर केलेल्या या शाईफेकीनंतर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गिरीश कुबेर यांच्या निषेधाच्या घोषणा देवून छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार करण्यात आला.

‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकात संभाजी महाराजांबद्दल अतिशय आक्षेपार्ह लिखाण असल्याचा दावा संभाजी ब्रिगेडचे नितीन रोटे पाटील यांनी केला. ‘संभाजी महाराजांनी त्यांच्या आईची हत्या केली, असा उल्लेख पुस्तकात आहे. त्याबद्दल संभाजी ब्रिगेडनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आज आमच्या संघटनेच्या दोन कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाईफेक केली. आम्हाला याचा जराही पश्चाताप वाटत नाही,’ असं रोटे पाटील म्हणाले.

Previous Post

मनातील कथा प्रेक्षकांसमोर ठेवण्यासाठी चित्रपट हे प्रभावी माध्यम ; दिग्दर्शकांनी व्यक्त केल्या भावना

Next Post
devendra fadanvis

साहित्य संमेलनात शाईफेक करणे हे चुकीचे आणि निषेधार्ह – फडणवीस

Related Posts
abvp - uday samant

विद्यापीठांच्या स्वतंत्रपणे चालणाऱ्या कामकाजात मंत्र्यांचा हस्तक्षेप होणार ? अभाविपकडून शिक्षणव्यवस्थेची अंत्ययात्रा

पुणे : दिनांक २८ डिसेंबर या दिवशी महाराष्ट्र विधानसभेमध्ये विद्यापीठ अधिनियम, २०१६ मध्ये नव्याने कलम ९ (अ) समाविष्ट…
Read More
श्रीधर पाटणकर

मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीची मोठी कारवाई, ठाण्यातल्या ११ सदनिका जप्त!

ठाणे – आज ईडीनं मोठी कारवाई करत प्रत्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे अर्थात रश्मी ठाकरे यांचे बंधु…
Read More

राज्याच्या ‘या’ भागात होऊ शकतो आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

पुणे – राज्यात काल सर्वाधिक कमाल तापमान ब्रम्हपुरी इथं 46 पूर्णांक 2 दशांश अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं.उस्मानाबाद, बीड,…
Read More