‘कपिल देव आले असते तर काहींच्या प्रसिद्धीला ग्रहण लागलं असतं’, संजय राऊत कडाडले

Sanjay Raut Angry On BCCI: १९८३ मध्ये भारताला पहिल्यांदा क्रिकेट विश्वचषक जिंकून देणारे माजी कर्णधार आणि अनुभवी खेळाडू कपिल देव यांना वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी आमंत्रित करण्यात आले नव्हते. मला फोन केला नाही म्हणून मी गेलो नाही. माझी इच्छा होती की माझ्या ८३ च्या संपूर्ण टीमला बोलावले असते तर अजून बरे झाले असते. पण इतके काम चालू आहे, इतके लोक आहेत, इतकी जबाबदारी आहे की, कधीकधी लोक विसरतात, असे कपिल देव यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितले.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही यावर भाष्य केलं आहे. पहिल्या विश्वविजेत्या संघाच्या कर्णधाराला आणि संघाला आमंत्रित केलं नाही, इतर राजकीय नेत्यांच्या प्रसिद्धीला ग्रहण लागलं असतं म्हणून निमंत्रण दिलेलं नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी बीसीसीआयवर (BCCI) हल्ला चढवला आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत बोलताना म्हणाले की, “वर्ल्डकप भारतीय संघ हरल्याचं दुख: सर्वांनाच आहे. खेळात हार जीत होत असते. मात्र, जो संघ सलग 10 सामने जिंकला, तो कालचा समाना हरला. क्रिकेटमध्ये राजकीय लॉबी शिरली आहे. त्या लॉबीनं वल्लवभाई स्टेडीएमचं नाव बदलले आणि समाना तिथे घेऊन श्रेय घेण्याचा प्रयत्न करत होते. वर्ल्डकप आम्हीच जिंकणार आहोत, अशाच थाटात भाजप होता. निकालानंतरची जी व्यवस्था केली होती. त्यावर पाणी फिरलं गेलं.”

“कपिल देव आले असते तर काहींच्या प्रसिद्धीला ग्रहण लागलं असतं”
“पहिला विश्वविजेत्या संघाच्या कर्णधाराला आणि संघाला आमंत्रित केलं नाही. इतर राजकीय नेत्यांच्या प्रसिद्धीला ग्रहण लागलं असतं म्हणून निमंत्रण नाही.”, असं म्हणत वर्ल्डकप 2023 च्या फायनलचं आमंत्रण भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांना न देण्याच्या बीसीसीआयच्या कृत्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मोदी तिथे आहेत म्हणून विश्वचषक जिंकला, असं भासवण्याचा भाजपचा प्रयत्न होता, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

वर्ल्ड कप जिंकवून देण्यात अपयशी ठरलेल्या राहुल द्रविडचे काय होणार ? टीम इंडियाला मिळणार नवीन प्रशिक्षक ?

चंद्रशेखर बावनकुळे यांनी मकाऊमधील कॅसिनोमध्ये एका रात्रीत साडेतीन कोटी रुपये उडवले – राऊत

भारतात करोडपतींची संख्या वाढली, करोडो रुपयांच्या Mercedes, Audi, Lamborghini खरेदीची शर्यत लागली