माझा फ्लॅट पाहण्यासाठी रिकामटेकडे असलेले अनिल परब आणि संजय राऊत यांना पाठवा – राणा

मुंबई  – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून बाहेर पडताच नवनीत राणा यांनी काल सिंहगर्जना केली. यावेळी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना ओपन चॅलेंज दिलं आहे.तसेच त्यांनी इतर मुद्द्यावरून देखील शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

आज पुन्हा एकदा राणा दाम्पत्याने शिवसेनेला लक्ष्य केले. मुंबई पोलिसांनी आमचा पोलीस ठाण्यात छळ केला असल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला. महाराष्ट्रात सुरू असलेल्या सूडाच्या कारवाईची माहिती लोकसभा अध्यक्षांसह गृहमंत्र्यांना देणार असल्याचे रवी राणा यांनी म्हटले.
नवनीत राणा यांनी म्हटले की, लोकप्रतिनिधींसोबत अशी वर्तवणूक होत असेल तर सामान्य लोकांचे काय होत असेल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असून तुरुंगात झालेल्या छळाची माहिती त्यांना देणार आहे. उद्धव ठाकरे यांनी आम्हाला नैतिकतेचे धडे शिकवू नये असेही नवनीत राणा यांनी म्हटले.

आमदार रवी राणा यांनीदेखील शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. एका महिलेला सरकारने अपमानास्पद वागणूक दिली असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारकडून आमच्या द्वेषातून कारवाई करत असल्याचे त्यांनी सांगितले. आम्हाला खार पोलीस ठाण्यात पोलिसांना चहा दिला. त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी आम्ही तुम्हाला जामिनावर सोडू, असे सांगितले होते. मात्र, त्यानंतर आम्हाला सांताक्रूझ पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्या ठिकाणी पहाटे पाच वाजेपर्यंत आम्हाला पाणीदेखील देण्यात आले नव्हते असेही रवी राणा यांनी म्हटले. मुंबईत माझा एकच फ्लॅट आहे. फ्लॅट पाहण्यासाठी त्यांनी रिकामटेकडे असलेले अनिल परब आणि संजय राऊत यांना पाठवावे असा टोलाही राणा यांनी लगावला.