‘चुलीत घाला तो निकाल तुमचा..’, राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर Sanjay Raut चिडले

Sanjay Raut : राष्ट्रवादी आमदार अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी निकाल दिला असून शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष मुळचा अजित पवारांचा असल्याचा निर्णय नार्वेकर यांनी दिला आहे. आमदारांच्या संख्याबळावर पक्ष कुणाचा असेल हे ठरवले जाईल, असे नार्वेकरांनी सांगितले आहे. अजित पवार गटाकडे ५३ पैकी ४३ आमदार आहेत. त्यामुळे अजित पवार गट खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे नार्वेकरांनी सांगितले आहे.

या निर्णयानंतर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. ‘चुलीत घाला तो निकाल तुमचा..’ अशी अत्यंत उद्विग्न प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

‘या शतकातला सगळ्यात किरकोळ निर्णय आहे हा.. किरकोळ.. याला ना ऐतिहासिक महत्त्व आहे ना यामध्ये काय यात अभ्यास आहे. म्हणजे समोर दिसतंय की, खून केला आहे.. खून होतोय लोकशाहीचा खून होतोय.. एका पक्षाचा खून होतोय आणि न्यायसनावर बसलेली व्यक्ती त्याला निर्दोष सोडतंय.. याला काय निकाल म्हणतात काय? चुलीत घाला तो निकाल तुमचा..’

‘विधानसभा अध्यक्ष काय रामशास्त्री आहेत का? ते दामशास्त्री आहेत. बघा.. अपात्र कसे करतील ते? शिवसेना आमदारांना त्यांनी अपात्र केलं नाही.. मुळात हा निकालच नाहीए.. हा वरून एक निकालाचा कागद आलाए.. तो फक्त त्यांनी वाचून दाखवला.’

‘कायदेशीर प्रक्रिया सर्वच पक्षांना करावा लागतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मूळ शरद पवारांचाच.. नार्वेकर काहीही बोलू द्या. त्यांनी काही सांगू द्या.. जसं आज इलेक्ट्रॉल बाँडबाबत निकाल दिला.. भाजपच्या तिजोरीत कसा काळा पैसा येतोय. तसा हा जो काळा निर्णय आहे.. शिवसेना, राष्ट्रवादीच्या बाबतीत.. हा काळ निर्णय आहे. तो दूर करण्यासाठी सुप्रीम कोर्टात जावं लागेल.’ असं म्हणत संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्या निकालावर संताप व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या

NCP MLA Disqualification : राष्ट्रवादी अजितदादांचीच, शरद पवार यांना मोठा धक्का

Jagdish Mulik | पुणे लोकसभा निवडणुकीसाठी जगदीश मुळीकांच्या उमेदवारीची शक्यता वाढली

Surya Ghar Yojana | मोफत वीज योजनेसाठी नोंदणी झाली सुरू, असा करू शकता अर्ज