Shankar Abhyankar | अशक्यप्राय परिवर्तन मोदींनी करुन दाखवलं

Shankar Abhyankar |  देशात अशक्यप्राय वाटत असलेलं परिवर्तन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी करुन दाखवलं असून, प्रभू श्रीरामचंद्रांची प्रजा कल्याणाची भूमिका घेऊन नरेंद्र मोदी देशाचा राज्य कारभार चालवत आहेत, अशी स्पष्ट भूमिका विद्या वाचस्पती गुरुदेव श्री शंकर वासुदेव अभ्यंकर (Shankar Abhyankar) यांनी मांडली आहे. विवेक व्यासपीठ प्रकाशनाच्या माध्यमातून लेखक आणि समरसता विचारक पद्मश्री रमेश पतंगे यांनी लिहिलेल्या ‘दि गेम चेंजर : नरेंद्र मोदी’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी (७ मार्च) त्यांनी आपले मत व्यक्त केले.

लोकमान्य टिळक सभागृह, केसरीवाडा, नारायण पेठ येथे या पुस्तकाचे प्रकाशन झाले. संयोजक कुणाल टिळक यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या वाचस्पती गुरुदेव श्री शंकर वासुदेव अभ्यंकर होते. लेखक पद्मश्री रमेश पतंगे, भाजपाचे राष्ट्रीय नेते सुनील देवधर (Sunil Deodhar) आणि माजी खासदार प्रदीप दादा रावत यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

विद्या वाचस्पती गुरुदेव श्री शंकर वासुदेव अभ्यंकर यावेळी म्हणाले की, “नरेंद्र मोदी हे देशातील आमूलाग्र क्रांतीचे अग्रदूत आहेत. देशात राष्ट्रीय चेतना जागवण्याचे काम संघाने केले, त्याच धर्तीवर नरेंद्र मोदी काम करत आहेत. राष्ट्राचा मुख्य स्वर हा धर्म आहे. पंतप्रधान मोदी देशात हिंदू धर्माला पुनर्स्थापित करत आहेत. त्यामुळे लोकमान्य टिळकांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या जागेवर हा ग्रंथ प्रकाशित होणे, ही खूप भाग्याची गोष्ट आहे.”

ते पुढे म्हणाले की, सुनील देवधर यांनी पुण्यातून त्रिपुरात जावून केलेले कार्य खूप मोठे आहे. अनेक वर्षांच्या डाव्या विचारसरणीच्या गडाला खिंडार पाडण्याचे काम त्यांनी केले असून, त्यांच्यासारखे अभ्यासू, सुसंस्कृत आणि सुज्ञ लोकप्रतिनिधी आपल्या पुण्याला असणे अपेक्षित आहे..

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष कुणाल टिळक यांनी केले. २००४ ते २०१४ या काळात धोरण पक्षघात झालेला भारत, आजच्या घडीला विकसित भारत म्हणून आपल्या समोर उभा आहे. आपल्या सर्वांना मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून पहायचे आहे, अशा भावना यावेळी कुणाल टिळक यांनी व्यक्त केल्या.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

“नरेंद्र मोदींना पर्यायाची आवश्यकता नाही, तर विरोधकांना पर्याय उभा करण्याची गरज आहे. कारण एवढी वर्षे सत्तेचा उपभोग घेण्याचं काम काँग्रेसने केलं, परंतु मोदींनी मात्र जनतेसाठी पदाचा उपयोग केला. तसेच गुलामगिरीच्या सावटातून बाहेर पडण्याचे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी साकार करत आहेत.”, अशा भावना यावेळी भाजपाचे नेते सुनील देवधर यांनी व्यक्त केल्या.

“मोदींच्या व्यक्तिमत्त्वाची उकल या पुस्तकातून झालेली असून, नरेंद्र मोदींना समजून घ्यायचे असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समजून घेतला पाहिजे. १० वर्षात भारत अशा टप्प्यावर येऊन पोहोचला आहे की, तो आता विकसनशील राहिलेला नाही तर विकसित राष्ट्र होण्याच्या टप्प्यावर उभा आहे”, असे मत माजी खासदार प्रदीप रावत यांनी व्यक्त केले.

संघाची कार्यशैली समजल्याशिवाय संघ भाजपाचे संबंध लक्षात येत नाहीत! राष्ट्र एका अंगाने विकसित होत नाही, त्यासाठी सर्वांगीण विकास झाला पाहिजे! राजकीय क्षेत्र हे समाजाचे सर्वात महत्त्वाचे अंग असून, ‘राष्ट्र प्रथम’ हा सिद्धांत घेऊनच पंतप्रधान काम करत आहेत. अशा भावना पुस्तकाचे लेखक पद्मश्री रमेश पतंगे यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केल्या. यावेळी शैलेश टिळक यांच्यासह मोठ्या संख्येने पुणेकर पुस्तक प्रेमी नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचलन अभय थिटे यांनी केले.

महत्वाच्या बातम्या :

Sunil Shelke | …अन्यथा मी राज्यभर सांगणार की पवार साहेबांनी माझ्यावर खोटे आरोप केले, सुनिल शेळकेंचा इशारा

Amit Shah | अमित शाह हे शेपूट घालणारे गृहमंत्री; उद्धव ठाकरे यांची सडकून टीका

Sharad Pawar | पक्ष स्थापनेपासून आम्ही विचारधारा कधीच बदलली नाही; शरद पवार यांचा दावा