Shahajibapu Patil | शरद पवारांना सध्या ‘या’ कारणामुळे सतत राग येतोय, शहाजीबापूंनी सांगितलं कारण

Shahajibapu Patil | शरद पवार (Sharad Pawar) गेल्या काही दिवसांपासून सगळीकडेच रागाने बोलताना दिसत आहेत. त्यांच्या घरात जो व्यक्तिगत प्रश्न निर्माण झाला आहे, त्याचा हा परिपाक असावा, असा निष्कर्ष आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी काढला आहे. पंढरपुरात बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

शरद पवार (Sharad Pawar) यांनी लोणावळा येथे बोलताना आमदार सुनील शेळके यांच्यावर ज्या भाषेत संताप व्यक्त केला त्याबाबत छेडले असता शहाजीबापू बोलत होते . अजित पवाराच्या भूमिकेमुळे जरी साहेब रागावले असले तरी अजित पवार यांचीच भूमिका बरोबर आहे, असे देखील पाटील सांगायला विसरले नाहीत.

पुढे बोलताना ते म्हणाले, माढा लोकसभेत सध्या  प्रत्येकजण आपला हेतू साध्य करण्यासाठी वेगवेगळी भाषा वापरत आहे. पण उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्व वातावरण निवळलेले असेल. माढा लोकसभेसाठी रामराजे यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील हे उमेदवारी मागत आहेत . पण ज्यावेळी उमेदवाराची घोषणा होईल त्यावेळी सर्व पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते दिलेल्या उमेदवाराला निवडून आणतील, असा विश्वासही शहाजीबापू यांनी व्यक्त केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Sunil Shelke | …अन्यथा मी राज्यभर सांगणार की पवार साहेबांनी माझ्यावर खोटे आरोप केले, सुनिल शेळकेंचा इशारा

Amit Shah | अमित शाह हे शेपूट घालणारे गृहमंत्री; उद्धव ठाकरे यांची सडकून टीका

Sharad Pawar | पक्ष स्थापनेपासून आम्ही विचारधारा कधीच बदलली नाही; शरद पवार यांचा दावा