‘त्या’ प्रश्नावर शरद पवार भडकले,म्हणाले, “तुम्ही अक्कल…”

Mumbai – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी २०२४ च्या निवडणुकीपूर्वी शरद पवार भाजपाबरोबर येतील, असं मोठं वक्तव्य केलं. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) संतापले. ते शुक्रवारी (२५ ऑगस्ट) बारामतीत पत्रकारांशी बोलत होते.

चंद्रशेखर बावनकुळेंनी २०२४ च्या निवडणुकीपूर्वी शरद पवार भाजपाबरोबर येतील, असं मोठं वक्तव्य केलं. त्यावर विचारलं असता शरद पवार म्हणाले, “काहीही प्रश्न काय विचारता. तुम्ही अक्कल तरी वापरा.”

यावेळी शरद पवार यांनी सुप्रिया सुळेंनी केलेल्या अजित पवार आमचे नेते आहेत या वक्तव्याचं समर्थन केलं. ते म्हणाले, “अजित पवार आमचे नेते आहेतच. त्यात काही वादच नाही. फूट पडणं याचा अर्थ काय? पक्षात फूट कधी पडते? जर पक्षातलाच एक मोठा वर्ग देश पातळीवर वेगळा झाला तर फूट पडते. आज तशी स्थिती इथे नाही. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर लोकशाहीत त्यांचा तो अधिकार आहे. त्यांनी वेगळा निर्णय घेतला म्हणून त्यावरून लगेच पक्षात फूट पडली म्हणायचं कारण नाही. तो त्यांचा निर्णय आहे.