पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नाही – अमित शाह

बारामुल्ला – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी पाकिस्तानशी (Pakistan) कोणत्याही चर्चेला नकार देत मोदी सरकार केवळ जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) लोकांशीच चर्चा करेल आणि काश्मीर खोऱ्यातून कोणत्याही परिस्थितीत दहशतवादाचा नायनाट करेल, असं प्रतिपादन काल केलं. काश्मिरच्या बारामुल्ला शहरात (Baramulla City) आयोजित सभेत ते बोलत होते.

तीन परिवारांनी गेल्या 75 वर्षांमध्ये जम्मू आणि काश्मीरची अवस्था बिकट केली, अशी टीकाही अमित शाह यांनी काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी या पक्षांवर केली आहे. मोदी सरकारने काश्मीरमध्ये विकासात्मक आणि औद्योगिक क्रांती आणली आहे. गेल्या 75 वर्षांमध्ये काँग्रेस, एनसी आणि पीडीपीने जम्मू काश्मीरमध्ये फक्त 15,000 कोटी रुपये गुंतवणूक आणली होती तर मोदी सरकारने काही वर्षांतच 56,000 कोटी गुंतवणूक आणली, अशी माहितीही शाह यांनी यावेळी दिली.