नवीन कार खरेदी करण्यासाठी कार लोन घ्यावे की पर्सनल लोन घ्यावे ? नफा-तोटा काय आहे ते जाणून घ्या

पुणे – तुम्हाला सणासुदीच्या काळात नवीन कार(car) घ्यायची असेल, तर तुम्ही ही बातमी एकदा जरूर वाचा. जर तुमच्याकडे कार घेण्यासाठी पुरेसे पैसे(money) नसतील तर तुम्ही कर्ज (loan) घेऊनही कार खरेदी करू शकता. पण बऱ्याचदा लोकं कोणते लोन घेऊन कार घ्यावी यात कन्फ्युज होतात. आज आम्ही तुम्हाला पर्सनल लोन(personal loan) आणि कार लोन(car loan) यातील फरक सांगणार आहोत यामुळे तुंम्हाला समजेल की कार कशी घ्यावी.

पर्सनल लोन आणि कार लोन

पर्सनल लोन हे असुरक्षित कर्ज आहे. कार लोन हे सुरक्षित कर्ज आहे. कार लोन मध्ये, तुम्ही त्या कर्जाची पूर्ण परतफेड करेपर्यंत तुमची कार बँकेकडे गहाण ठेवली जाते. वैयक्तिक कर्ज देताना कोणतीही बँक अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे मासिक उत्पन्न आणि क्रेडिट स्कोअर यांसारख्या बाबी विचारात घेते.

काय महत्वाचे आहेत

आपण असे गृहीत धरू की जर तुम्ही 15 लाख रुपयांची कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बँका या किमतीच्या 80-90 टक्के इतके कर्ज सहज देऊ शकतात. तुमच्याकडे ईएमआय भरण्याची क्षमता असली पाहिजे. अनेक बँका कारच्या किमतीच्या 100 टक्क्यांपर्यंत कर्जही देत ​​आहेत.

पर्सनल लोन

जर तुम्हाला पर्सनल लोन घ्यायचे असेल तर बँकेकडे सिक्युरिटी म्हणून काहीही नसते. तुमचा क्रेडिट हिस्ट्री आणि कर्ज परतफेडीची क्षमता म्हणजेच उत्पन्न पाहूनच त्यांना कर्ज द्यावे लागते. दुसरीकडे, वैयक्तिक कर्जासाठी कार, मालमत्ता, मौल्यवान दागिने गहाण ठेवण्याची गरज नाही. यासाठी तुमचे मासिक उत्पन्न आणि क्रेडिट स्कोर चांगला असावा.

कार लोन

जर तुम्ही कार लोन घेऊन नवीन कार खरेदी केली तर तुम्ही कर्जाची संपूर्ण रक्कम परतफेड करेपर्यंत ती कार पूर्णपणे तुमची नसते. म्हणजेच कर्ज पूर्ण होईपर्यंत कारची मालकी तुम्ही ज्या बँकेकडून कर्ज घेता त्या बँकेकडे असते. नवीन कारची कागदपत्रे बँक किंवा वित्तीय संस्थेकडे गहाण असतात. जर तुम्ही दिलेल्या मुदतीत कर्जाची परतफेड केली नाही, तर बँक किंवा वित्तीय संस्था तुमच्या कारचा लिलाव करून तुमचे पैसे वसूल करू शकतात. बहुतांश बँका पर्सनल लोनवर जास्त व्याज आकारतात. पण त्या तुलनेत कार कर्जावरील व्याजदर कमी आहे. तर वैयक्तिक कर्जे असुरक्षित असल्यामुळे महाग आहेत. या दोनपैकी कोणत्याही कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी, व्याजदरांची तुलना करावी.