Amit Thackeray | वसंत मोरेंना पंतप्रधान व्हायचंय, ते सोशल मीडियाच्या आहारी गेलेत; अमित ठाकरेंच्या तात्यांना कानपिचक्या

Amit Thackeray On Vasant More | मनसेतून राजीनामा दिल्यानंतर वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडीकडून पुणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळाली आहे. परंतु मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांना हा निर्णय पचला नसल्याचे दिसत आहे. वसंत मोरेंच्या उमेदवारीबद्दल पुण्यात बोलत असताना अमित ठाकरेंनी त्यांच्यावर हल्लाबोल केला.

वसंत मोरे यांना पंतप्रधान व्हायचं आहे. ते सोशल मीडियाच्या आहारी गेलेत. त्यांनी मनसेकडून पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा राज साहेबांचा आदेश पाळावा आणि महायुतीच्या प्रचारात सहभागी व्हावे, असे अमित ठाकरे यांनी म्हटले. यावर आता वसंत मोरे काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Amol Kolhe | ‘आमच्या गावासाठी पाच वर्षांत काय केले?’ करंदी ग्रामस्थांचा अमोल कोल्हेंना थेट सवाल

Murlidhar Mohol | मनसेच्या साथीनं महायुतीचे मताधिक्य वाढणार!, मुरलीधर मोहोळ यांनी घेतली अमित ठाकरेंची भेट

Narendra Modi | मोदीजींची विकेट काढायला विरोधकांकडे ना बॉलर ना बॅट्समन, शिंदेंचा विरोधकांवर घणाघात