मुंबई – गेली दोन वर्ष विरोधक आघाडी सरकार जाण्याच्या वेगवेगळ्या तारखा देत आहेत मात्र नारायण राणे ( Narayan Rane ) यांनी मार्च ही जास्तच मुदत दिली त्याबद्दल नारायण राणे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आभार मानले आहेत.
नारायण राणे यांनी आघाडी सरकार मार्चपर्यंत जाणार असे भाकीत केले आहे त्यावर बोलताना जयंत पाटील यांनी नारायण राणे यांच्या भाकीताची खिल्ली उडवली आहे.
आतापर्यंत भाजपच्या नेत्यांनी पाच – सहा वेळा वेगवेगळ्या तारखा दिल्या आहेत. लोकांना आशेवर ठेवणं ही त्यांची जबाबदारी आहे हे मी समजू शकतो असा टोलाही जयंत पाटील यांनी यावेळी लगावला आहे.
त्यांचा पक्ष टिकवायचा असेल तर अशी आश्वासने व असं वातावरण कायम ठेवावं लागतं अशी टीकाही जयंत पाटील (Jayant Patil) यांनी यावेळी केली.
https://www.youtube.com/watch?v=bpv7YA2PK9g&t=5s