प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसुचित जाती विभागाचे शिर्डीत दोन दिवसांचे शिबीर – सिद्धार्थ हत्तिअंबिरे

दिनांक २ व ३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या शिबिरात केंद्र व राज्यातील वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन.

Scheduled Caste Two Days Camp: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसुचित जाती विभागाचे दोन दिवसांचे राज्यस्तरीय शिबीर शिर्डीत (Shirdi) दिनांक २ व ३ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, अनुसुचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश लिलोठिया, राष्ट्रीय समन्वय के, राजू, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री तसेच CWC सदस्य अशोक चव्हाण, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह वरिष्ठ नेते मार्गर्शन करणार आहेत, अशी माहिती प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसुचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी दिली आहे.

“दोन दिवसांच्या या शिबिरात राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक ताकद वाढवणे, काँग्रेस पक्षाची विचारधारा घराघरात पोहचवण्यासह काँग्रेस पक्षाला राज्यात व देशात पुन्हा सत्तेत आणण्यासाठी काम करण्यासंदर्भात माहिती दिली जाणार आहे. २०१४ पासून देशतील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात अनगोंदी कारभार सुरु झालेला आहे. जाती धर्मात तेढ निर्माण करुन भाजपा राजकीय पोळी भाजत आहे. देशाचे स्वातंत्र्य, लोकशाही व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान धोक्यात आले आहे, हे संविधान बदलण्याचे काम भाजपा करत आहे. भाजपाच्या विखारी प्रचाराराला रोखून काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणणे यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. संविधान टिकले तरच आपले स्वातंत्र्यही टिकेल, त्यासाठी आगामी सर्व निव़णुकांत काँग्रेसचे उमेदवारच निवडणून येतील यासाठी अनुसुचित विभागाला काम करायचे आहे”, असे हत्तीअंबिरे यांनी सांगितले.

हॉटेल साई पालखी निवारा, निमगाव-निघोज नगर, मनमाड-शिर्डी रोड, येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या दोन दिवसांच्या राज्यस्तरीय शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी एससी विभागाच्या पदाधिकाऱ्यांना केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा

अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ नियोजित वेळेतच सायंकाळी विसर्जन मिरवणुकीत होणार सहभागी

भाईजानचा थाटच न्यारा! गळ्यात भगवं उपरणं टाकून पोहचला CM शिंदेंच्या घरी गणरायाच्या दर्शनाला