“चोरांची हंडी फोडतो पण आजची..” सोमय्यांनी लुटला दहिहंडीचा आनंद; डान्सचा व्हिडिओ व्हायरल

Kirit Somaiya Dahihandi: काल महाराष्ट्रात सर्वत्र दहिहंडीचा (Dahihandi) सण धूमधडाक्यात साजरा झाला. सामान्यांपासून ते अभिनेते आणि राजकीय नेत्यांबरोबर सर्वांनी जल्लोषात हा सण साजरा केला. अगदी भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राम कदम यांनी आयोजित केलेल्या दहिहंडी कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी दहिहंडी फोडली आणि भन्नाट डान्सही केला.

किरीट सोमय्या यांनी कार्यकर्त्यांच्या खांद्यावर चढून दहिहंडी फोडली. भर पावसात त्यांनी दहिहंडी फोडण्याचा आनंद लुटला. त्यानंतर त्यांना नाचण्याचा मोह आवरला नाही आणि ते मनसोक्त नाचू लागले.

कार्यक्रम संपल्यावर किरीट सोमय्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यक्रमात लुटलेला आनंद व्यक्त केला. यावेळी त्यांनी घोटाळे करणाऱ्यांना टोला देखील लगावला. “तिसऱ्या थरावर जाऊन हंडी फोडली. चोरांची हंडी फोडत असतो. आजची हंडी फोडण्याची मजा वेगळी होती. कोव्हीड घोटाळ्यापासुन खिचडी चोरांपर्यंत कुणाला सोडणार नाही. महाराष्ट्राला आश्वासनं देतो.” असं किरीट सोमय्या म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्याः

‘देश, संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस, इंडिया आघाडी व राहुल गांधी यांची लढाई सुरु आहे’

वनडे विश्वचषकानंतर राहुल द्रविड सोडू शकतात प्रशिक्षकपद, बीसीसीआयला शोधावा लागणार नवा गुरू

“PM मोदींचे अपयश झाकण्यासाठी सनातन धर्माचा वापर”; उदयनिधींचा भाजपवर पलटवार