‘फ्लावर नाही फायर होणार; राजीनामा तर तुमच्या बापालाही द्यावा  लागणार’

मुंबई – राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीनं अटक (Arrest) केल्यानंतर भाजपने (BJP) आक्रमक पवित्रा घेतला आहे. मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप (BJP) आज मुंबईत (Mumbai) मोर्चा  काढण्यात आला  दरम्यान, तत्पूर्वी भाजप नेत्यांची जोरदार भाषणे आझाद मैदानावर झाली. यावेळी बोलताना भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार  यांनी महाविकास आघाडीवर हल्ला चढवला.

मुनगंटीवार म्हणाले, नवाब मलिक यांच्यामागे सत्ता उभी केली. या सरकारपासून महाराष्ट्राला मुक्त करायचं आहे. बेईमान आघाडीला नेस्तनाबूत करायचं आहे. युतीच्या प्रेमापोटी नवाब मलिक यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. दहशतवादामध्ये ज्यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे त्यांना जमिनीच्या माध्यमातून पैसे वाटले. ज्या देशाचा देशभक्त दहशतवादाला विसरतो तो कधीच सुरक्षित राहू शकत नाही.

1993 बॉम्बस्फोटात कोणी हात गमावला, कोणी पाय गमावला. यांना सत्ता प्रिय आहे. सत्तेसाठी विचार करणारी लोक आहेत. आमच्या पक्षाचं चिन्ह फ्लॉवर आहे पण आम्ही आता फ्लावर नाही फायर होणार. राजीनामा तुमच्या बापाला द्यावा लागेल. भाजपने तुमची दाणादाण केली आहे. या नेत्यांच्या तावडीतून महाराष्ट्राला वाचवायचं आहे, अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारवर निशाणा साधला.