Suhas Patil | इंद्रायणी बालन फाऊंडेशन, पुनित बालन ग्रूपचे कार्य वाखाणण्याजोगे

कुरुंदवाड (Suhas Patil) : पुणे येथील इंद्रायणी बालन फांऊंडेशन व पुनित बालन ग्रुप (Punit Balan Group) यांचे समाजोपयोगी कार्य वाखाणण्याजोगे असल्याचे मत स्पेशल कमांडो सुरक्षा भागाचे पोलीस सुहास पाटील (Suhas Patil) यांनी केले. ते येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलला इंद्रायणी बालन फाउंडेशन व पुनीत बालन ग्रुप यांचे मार्फत इंट्रॅक्टीव्ह पॅनल प्रदान कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस. वाय. पाटील उपस्थित होते. या ग्रुप मार्फत संस्थेला सुमारे १२ लाखाचे ६ इंट्रॅक्टीव्ह पॅनल मंजूर करण्यात आले आहेत. मुख्याध्यापक विनोद पाटील म्हणाले, बालन ग्रुपची शिक्षण, खेळ, समाज व देशातील जवानाप्रती असलेली आपुलकी त्यांच्या कार्यातून स्पष्ट होते. या कामी सुहास पाटील यांनी पाठपुरावा केल्याबद्दल संस्थेमार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला. उदय पाटील यांनी स्वागत करताना नवीन तंत्रज्ञानाचा वापर शैक्षणिक गुणवत्ता वाढी साठी होत असल्याचे मत व्यक्त केले. आभार आर. एस. खोपडे यांनी मानले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

पुण्यात मुरलीधर अण्णांचाच विजय पक्का? ‘हे’ फॅक्टर्स मिळवून देणार त्यांना महाविजय?

Sharad Pawar | मोदी साहेब माझ्या बोटाला हात लावू नका, शरद पवारांचा पंतप्रधानांना इशारा

Amol Kolhe | जे सरकार शिवाजी महाराजांच्या पहिल्या राजधानीच्या नावाने नामकरण करतं, ते सरकार त्यांचे आदर्श पाळते का?