Nana Patole | शेतकऱ्यांना फसवणाऱ्या मोदी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करा

Nana Patole | भारत जोडो यात्रेदरम्यान चांदवड येथे शेतकरी मेळाव्याला संबोधित करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, २०१४ च्या निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी यांनी सरकार आले की पहिली सही शेतकरी कर्जमाफीच्या फाईलवर करेन असे आश्वासन दिले होते, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, हमी भाव देणार अशी आश्वासने यवतमाळमध्ये दिली होती पण १० वर्षात ती पूर्ण केली नाहीत, मोदींनी शेतकऱ्यांना फसवले आहे. कांदा नाही खाल्ला तर काही फरक पडत नाही असे भाजपच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण म्हणाल्या होत्या. या शेतकरीविरोधी व शेतकऱ्यांना फसवणाऱ्या भाजपा सरकारचा करेक्ट कार्यक्रम करायची वेळ आली आहे आणि लोकसभा निवडणुकीत तो करा, असे आवाहन पटोले (Nana Patole) यांनी केले.

या शेतकरी मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्ष नेते बाळासाहेब थोरात, AICC मीडिया विभागाचे प्रभारी जयराम रमेश, AICC सचिव आशिष दुआ, माजी मंत्री CWC सदस्य यशोमती ठाकूर, माजी राज्यमंत्री विश्वजित कदम, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, NSUI चे प्रदेशाध्यक्ष आमीर शेख, सरचिटणीस ब्रिजेश दत्त, प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, हेमलता पाटील, माजी आमदार शिरीष कोतवाल, कम्युनिस्ट नेते माजी आमदार जीवा पांडू गावात यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी व हजारो शेतकरी उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

पुण्यात मुरलीधर अण्णांचाच विजय पक्का? ‘हे’ फॅक्टर्स मिळवून देणार त्यांना महाविजय?

Sharad Pawar | मोदी साहेब माझ्या बोटाला हात लावू नका, शरद पवारांचा पंतप्रधानांना इशारा

Amol Kolhe | जे सरकार शिवाजी महाराजांच्या पहिल्या राजधानीच्या नावाने नामकरण करतं, ते सरकार त्यांचे आदर्श पाळते का?