देऊळगावगाडा येथील एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या…

दौंड : दौंड तालुक्यातील देऊळगावगाडा येथील एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मल्हारी नामदेव बारवकर असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.

केडगाव येथील एमपीएससीचा विद्यार्थी स्वप्नील लोणकर याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. स्वप्नील लोणकर यांच्या नंतर मल्हारी बारवकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे . एमपीएससी चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची गेल्या काही महिन्यांतील ही दुसरी घटना घडली आहे .

या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की शुक्रवार दि १७ रोजी च्या सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे..मल्हारी नामदेव बारवकर याने एमपीएससी च्या परीक्षेचे तीन पेपर दिले होते.एमपीएससी परीक्षेची पूर्व तयारी करत असल्याने या नैराश्यातुन त्याने आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक माहिती मिळत आहे…

या घटनेची फिर्याद मल्हारी बारवकर चे चुलते महादेव पांडुरंग बारवकर यांनी पाटस पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे..

या घटनेबाबत माहिती मिळताच पाटस पोलीस चौकीचे हवालदार भानुदास बंडगर,पोलीस नाईक घनश्याम चव्हाण,पोलीस शिपाई समीर भालेराव यांनी घटनास्थळी धाव घेतली.