सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे अजितदादांमुळेच खासदार झाले आहेत – चाकणकर

Rupali Chakankar : अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी ‘सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे अजितदादांमुळेच खासदार झाल्याचे वक्तव्य केले आहे.त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

रुपाली चाकणकर म्हणाल्या, दादांवर बोलणारे दोन्ही खासदार दादांमुळे निवडून आले आहेत. सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे अजितदादांमुळेच खासदार झाले आहेत. दादा सोबत नाही म्हणून तळ ठोकावा लागत आहे. सुप्रीया सुळे गेली 15 वर्ष अजितदादांमुळे निवडून आल्या आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवार राष्ट्रवादी गट आणि महायुतीचा उमेदवार निवडून येईल.

यासोबतच अजित पवार मुख्यमंत्री व्हावे ही आमची इच्छा आहे, असे वक्तव्य रुपाली चाकणकर यांनी केले आहे. अजित दादांना मुख्यमंत्री होताना पाहायचं असेल तर आम्हला काम करावं लागेल. आमचं स्वप्न आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करू दादा मुख्यमंत्री व्हावं हे सर्वांची इच्छा आहे, असेही रुपाली चाकणकर म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या-

‘शेतकऱ्यांचं कंबरडे मोडण्याच पाप हे केंद्र सरकारने आणि ट्रिपल इंजिनच्या सरकारने केलेले आहे’

आमचं सरकार आल्यावर सरसकट कर्जमाफी होईल; खासदार सुप्रिया सुळे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

‘देवेंद्र फडणवीस केवळ आकडेवारी फेकतात, पण सत्य परिस्थिती ते जनतेपासून लपवतात’