INDvsAUS: सूर्यकुमारची कॅप्टन्सी खेळी, भारताने २ विकेट्सने जिंकला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला टी२० सामना

IND vs AUS 1st T20: वनडे विश्वचषकानंतर विशाखापट्टणम येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेला पहिला टी२० सामना भारतीय संघाने २ विकेट्स राखून जिंकला. या सामन्यात नवोदित व प्रभारी कर्णधार सूर्यकुमार यादव (Captain Suryakumar Yadav) याने शानदार खेळी केली. त्याच्या कॅप्टन्सी खेळीमुळे भारताने ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या २०९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून इशान किशन आणि कर्णधार सूर्यकुमार यांनी अर्धशतके झळकावली. ३९ चेंडूंचा सामना करताना इशानने ५८ धावा केल्या, ज्यामध्ये त्याच्या ५ षटकार आणि २ चौकारांचा समावेश होता. तर सूर्याने ४२ चेंडूत ४ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने ८० धावा फटकावल्या. शिवाय रिंकू सिंहनेही (Rinku Singh) संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले. त्याने १४ चेंडूत ४ चौकार मारत महत्त्वपूर्ण अशी नाबाद २२ धावांची खेळी केली.

तत्पूर्वी पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाकडून जोश इंग्लिशने ५० चेंडूत ११० धावांची शतकी खेळी केली. ८ षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीने त्याने ही खेळी केली. तर स्टिव्ह स्मिथनेही (५२ धावा) अर्धशतक झळकावले. मात्र त्यांच्या खेळी निष्फळ ठरल्या.

आता उभय संघातील पुढील सामना २६ नोव्हेंबर रोजी तिरुवनंतपुरम येथे होईल.

महत्वाच्या बातम्या-

‘त्याने बंद खोलीत दिलेलं वचन पुर्ण केलं..’, कर्णधारपदी विराजमान झाल्यावर सूर्याचा रोहितबाबत खुलासा

‘…तर ऐश्वर्या रायचा बलात्कार करायला मिळालं असतं’; अभिनेत्याचं धक्कादायक वक्तव्य

आदेश देऊनही होल्ड न काढणाऱ्या बँकावर कार्यवाही करा – स्वाभिमानी