सुषमा अंधारेनी एकनाथ भाई शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदावरती बोलण्यापेक्षा….; ज्योती वाघमारे यांचा प्रहार 

सोलापूर – सुषमा अक्का अंधारेनी  एकनाथ भाई शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाची काळजी करण्यापेक्षा,  रत्नाकर शिंदे यांच्या कुंटनखान्यावर पडलेल्या धाडीपासून स्वतःच्या राजकीय भविष्यावर जे प्रश्नचिन्ह लागले त्याची काळजी करावी असं सांगत शिवसेना प्रवक्त्या प्रा.डॉ. ज्योती वाघमारे यांनी अंधारेंवर टीकास्त्र सोडले आहे.

इर्शाळवाडीवर दरड कोसळल्यानंतर दोन तास चिखलामध्ये चालत जाऊन लोकांच्या पाठीशी उभे राहणारे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे हे अनाथांचे नाथ आहेत. महाराष्ट्राचे नाथ आहेत आणि  2024 पर्यंत तेच मुख्यमंत्री राहतील. औरंग्याच्या सैनिकांना पाणी पितानाही जसं संतांजी धनाजी दिसायचे तसेच  उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत आणि सुषमा अंधारेना स्वप्नात सुद्धा  एकनाथ भाई शिंदे दिसतात. आणि सुषमा अंधारेनी एकनाथ भाई शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदावरती बोलण्यापेक्षा आप्पासाहेब जाधव  अक्कांवर जे आरोप करतात किंवा त्यांचा मानलेला भाऊ रत्नाकर शिंदेच्या वेश्याव्यवसाय वरील धाडीत ज्या  अल्पवयीन दलित मुली सापडल्या त्यावर तोंड का उघडत नाहीत?? अशी जहरी टीका शिवसेना प्रवक्त्या प्राध्यापिका डॉक्टर ज्योति वाघमारे यांनी केली आहे.