Swara Bhasker: भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी झाली स्वरा भास्कर, म्हणाली, “आमच्या देवांची नावं घेऊन…”

Swara Bhasker In Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी रविवारी 17 मार्च रोजी सकाळी महात्मा गांधी यांच्या दक्षिण मुंबईतील घर ‘मणि भवन’ येथून ‘न्याय संकल्प पदयात्रा’ काढली. त्यांची बहीण प्रियंका गांधी वाड्रा आणि महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी काँग्रेस समर्थकांसह त्यांच्या पदयात्रेत सामील झाले.

‘न्याय संकल्प पदयात्रा’ ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत जाईल, जिथे 1942 मध्ये ब्रिटीशांपासून भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात भारत छोडो आंदोलन सुरू झाले होते. विरोधी भारत ब्लॉकचे काही सदस्य राहुल गांधी यांच्या पदयात्रेत सामील झाले. या यात्रेत बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करही (Swara Bhasker) सहभागी झाली होती. यावेळी ती म्हणाली की, आज सत्तेत द्वेषाचे राजकारण केले जात आहे.

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’वर अभिनेत्री स्वरा भास्कर म्हणाली, “त्यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या दोन भारत जोडो यात्रा कौतुकास्पद आहेत. लोकांची मने ऐकण्यासाठी देशभरात फिरून आलेल्या एकाही राजकारण्याला मी ओळखत नाही. राहुल गांधींना लोकांना भेटायचे आहे आणि त्यांच्याशी जोडायचे आहे… अशा प्रयत्नांमुळे आशा मिळते…”

“ज्या भारतामध्ये आपण मोठे झालो, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही. मात्र आपल्यात फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आज सत्तेत एक विशेष प्रकारचे राजकारण आहे जे द्वेषाचे राजकारण आहे. आपल्या देवांचे नाव घेऊन द्वेष पसरवला जात आहे, हिंदू असल्याने मला समजते की, आपल्या देवांची नावं घेऊन हत्या करण्याचं पाप केलं जात आहे.”, असं म्हणत स्वरानं सरकारवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या-

Loksabha Election Dates : महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका; कोणत्या तारखेला कुठे मतदान?

निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यावर कोणत्या गोष्टींवर बंदी घालण्यात येते? जाणून घ्या सर्वकाही

मनसेतून राजीनामा देऊनही उपयोग झाला नाही, वसंत मोरे यांचं खासदार बनण्याचं स्वप्न फक्त स्वप्नच राहणार?