मंदिरे पाडून मशिदी बांधल्या गेल्या पण, हिंदू धर्म संपला नाही – शरद पोंक्षे

नागपूर – अभिनेते शरद पोंक्षे (Actor Sharad Ponkshe) हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे ओळखले जातात. बऱ्याचदा त्यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे वाद देखील निर्माण होताना दिसून आले आहेत. यातच त्यांनी नुकतेच एक वक्तव्य केले असून या वक्तव्याची देखील चांगलीच चर्चा होताना दिसून येत आहे.

ते म्हणाले, भूतकाळ माहिती नसेल तर वर्तमान आणि भविष्य ठरवता येत नाही. आम्हाला आमच्या देशाचा इतिहास (History of the country) विसरायला आमच्या राज्यकर्त्यांनीच भाग पाडले, म्हणून भूगोल (Geography) बिघडत गेला. मूळ भारतातील ५० टक्के भूभाग आम्ही याआधीच गमावला आहे. मागील १३०० वर्षांत सतत आक्रमणे झाली, स्त्रियांवर अत्याचार झाले, मंदिरे पाडून मशिदी बांधल्या गेल्या. पण, हिंदू धर्म (Hinduism) संपला नाही.

हा देश इस्लामिक राष्ट्र (Islamic Nation) झाले नाही. या हिंदू धर्मात काय जादू आहे हे एकदा समजून घेतले पाहिजे. या धर्माचे इस्लामीकरण कधीही होऊ शकणार नाही. कुणी मूर्ती तोडल्या म्हणून ते आमच्यातील राम, कृष्ण आणि महादेव संपवू शकले नाहीत’, असे पोंक्षे म्हणाले. महाराष्ट्र टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

हा देश आता हिंदू राष्ट्र होणार आहे आणि येथील अहिंदूंची स्थिती अत्यंत वाईट होणार आहे, हे चित्र जाणीवपूर्वक उभे केले जाते आहे. हे करण्यात अहिंदूंपेक्षा पुरोगामी हिंदूच (Progressive Hindus ) पुढे आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.