Urfi Javed: ‘छोटा पंडित’ बनणे उर्फी जावेदला पडले महागात, मिळाल्या जीवे मारण्याच्या धमक्या

Urfi Javed Chota Pandit Look: सोशल मीडियावर सक्रिय असणारी उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या विचित्र कपड्यांमुळे चर्चेत असते, परंतु यावेळी तिच्या विचित्र कपड्यांमुळे ती अडचणीत आली आहे. यावेळी अभिनेत्रीला आउट ऑफ द बॉक्स फॅशन करणे चांगलेच महागात पडले असून त्यामुळे तिला पोलीस ठाण्यातही जावे लागले आहे. आपल्या कपड्यांच्या डिझाईन आणि नवीन फॅशनने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या उर्फी जावेदला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या (Urfi Javed Death Threats) आहेत. तिने हॅलोविनसाठी हा ड्रेस डिझाईन केला होता.

काही दिवसांपूर्वी उर्फी जावेदने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, त्या व्हिडिओमध्ये तिने ‘भूल भुलैया’ या बॉलिवूड चित्रपटातील राजपाल यादवसारखा (Rajpal Yadav) ‘छोटा पंडित’चा (Chota Pandit) गेटअप केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट होताच व्हायरल होऊ लागला, त्यानंतर एका अज्ञात व्यक्तीने उर्फी जावेदला ईमेल वरून तिला धमकी दिली आणि व्हिडिओ हटवण्यास सांगितले. तसे न केल्यास तिला ठार मारले जाईल, असेही सांगितले.

https://www.instagram.com/reel/Cy-HzVWoul9/?utm_source=ig_web_copy_link

उर्फीला ईमेलवर धमकी मिळाली
हा ईमेल मिळाल्यानंतर उर्फीने मुंबई पोलिसांना याची माहिती दिली आणि X (पूर्वी ट्विटर) वर पोस्ट देखील केली. उर्फीला दोन वेगवेगळ्या ईमेल आयडीवरून ईमेल आला. पहिला ईमेल तिला निखिल गोस्वामी नावाच्या ईमेल आयडीवरून आला होता ज्यामध्ये ‘तुम्ही अपलोड केलेला व्हिडिओ डिलीट करा, नाहीतर तुम्हाला मारायला वेळ लागणार नाही’ असे लिहिले होते. यानंतर दुसरा ईमेल आला जो रुपेश कुमार नावाच्या व्यक्तीच्या मेल आयडीवरून आला होता. या मेलमध्ये ‘उर्फी जावेद आमच्या हिंदू धर्माची बदनामी करत आहे, तुझे जीवन जग, मी तुला चौकाचौकात गोळ्या घालीन’ असे लिहिले होते.

उर्फीने X वर पोस्ट केले
तिचे मत व्यक्त करताना उर्फीने सोशल मीडियावर लिहिले की, ‘मला या देशातील लोकांची कमाल वाटते, मला धक्का बसला आहे, चित्रपटातील पात्र पुन्हा साकारण्यासाठी मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, तर त्या व्यक्तिरेखेला वाईट प्रकाशात टाकले जात आहे.’

महत्वाच्या बातम्या-

इश्क पर किसका जोर! काकूच्या प्रेमात वेडा झाला पुतण्या, पळून जाऊन लग्नाचं केलं प्लॅनिंग; पण…

मराठा आरक्षणाबाबत सरसकट निर्णय घ्या!- अशोक चव्हाण

रामा राघव फेम अभिनेत्री श्रद्धा पवारचं ‘प्रपोज’ हे रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला