मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असेच या सरकारचे धोरण दिसते – दरेकर

Pravin Darekar

मुंबई – महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे सरकारने गेल्या दोन वर्षांत मराठा समाजाचे गंभीर नुकसान केले असून त्याबद्दल या सरकारने समाजाची माफी मागितली पाहिजे आणि मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी ठोस काम केले पाहिजे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सोमवारी केली.

ठाकरे सरकारने दोन वर्षांत मराठा समाजाची कशी फसवणूक केली याची माहिती देण्यासाठी भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दरेकर म्हणाले की, ठाकरे सरकारने गंभीर चुका केल्यामुळे आणि सरकारच्या बेफिकीरीमुळे मराठा समाजाने असलेले आरक्षण गमावले. या सरकारमुळे सर्वोच्च न्यायालयाने सर्वप्रथम मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आणि नंतर ते रद्द केले. त्यानंतर ठाकरे सरकारने मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी कोणतेही गंभीर प्रयत्न केलेले नाहीत. या सरकारने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिकेसाठी पाठपुरावा केलेला नाही किंवा न्या. भोसले समितीने केलेल्या शिफारशींनुसार पावले टाकलेली नाहीत. हे सरकार मराठा आरक्षण हा विषयच विसरून गेल्यासारखी स्थिती आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असेच या सरकारचे धोरण दिसते.

त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा युती सरकारने २०१८ साली कायदा करून मराठा समाजाला सरकारी नोकरी व शिक्षणात आरक्षण दिले. त्यामुळे मराठा समाजाची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली. फडणवीस सरकारने उच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकविले. हे सरकार असेपर्यंत मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती आली नव्हती. तथापि, ठाकरे सरकारला मराठा समाजाचे अस्तित्वात असलेले आरक्षणही टिकविता आले नाही. ठाकरे सरकारने योग्य बचाव केला नसल्यामुळे गायकवाड आयोगाचा अहवाल फेटाळला गेला. मराठा समाज मागास आहे, हे आता नव्याने सिद्ध करावे लागेल व तसे करताना सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तरे द्यावी लागतील.
ते म्हणाले की, केंद्र सरकारने घटनादुरस्ती करून खुलासा केल्यामुळे राज्याला मराठा आरक्षणाचे पूर्ण अधिकार आहेत. फडणवीस सरकारने जसा पुढाकार घेतला तसाच पुढाकार घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी ठाकरे सरकारने पावले टाकायला हवीत. पण हे सरकार आणि शरद पवारांसारखे आघाडीचे प्रमुख नेते मराठा आरक्षण या विषयावर आता बोलतही नाहीत.

त्यांनी सांगितले की, मराठा समाजाच्या कल्याणासाठी भाजपा युती सरकारने सारथी संस्था स्थापन करून होतकरू तरुण तरुणींना करिअरसाठी भरघोस मदत केली होती पण ठाकरे सरकारने या संस्थेचे महत्त्व कमी केले आणि संस्थेच्या योजनांना कात्री लावली आहे. भाजपा युती सरकारने अण्णासाहेब पाटील महामंडळाचे पुनरुज्जीवन करून मराठा समाजातील तरूण तरुणींना भांडवल पुरवठा केला आणि आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत केली. आता ठाकरे सरकारमुळे अण्णासाहेब पाटील महामंडळाचा कारभारही ठप्प झाला आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहे, निर्वाह भत्ता, शिष्यवृत्ती अशा फडणवीस सरकारच्या योजनाही आता ठप्प झाल्या आहेत. उद्धव ठाकरे सरकारने मराठा समाजाची सर्व प्रकारे फसवणूक केली असून या सरकारने आणि महाविकास आघाडीने मराठा समाजाची माफी मागितली पाहिजे.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post

नववीत शिकणाऱ्या मुलीच्या ई-मेल तक्रारीची पोलिसांनी घेतली दखल, कॉल करून त्रास देणाऱ्या इसमाला शिकवला धडा

Next Post

दंगल घडविण्याच्या प्रकाराची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या मार्फत चौकशी करावी भाजपा

Related Posts
team india

पहिल्या टी-२० मॅचपूर्वी टीम इंडियाला धक्का; ‘स्टार’ खेळाडू पडला मालिकेबाहेर!

कोलकाता – अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे कोलकाता इथं वेस्ट इंडिजविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतून बाहेर पडला…
Read More
चंद्रकांत पाटील

कोथरूड मध्ये ‘हर घर तिरंगा’अभियान १००% यशस्वी होणार; चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

पुणे – भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील ( MLA Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीमध्ये बूथ सशक्तीकरण…
Read More
अजित पवार बनले महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीच्या 'या' ९ नेत्यांनाही मिळाली मंत्रीपदे

अजित पवार बनले महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीच्या ‘या’ ९ नेत्यांनाही मिळाली मंत्रीपदे

मुंबई- आज राजभवन येथील दरबार हॉलमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यपाल रमेश बैस, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री…
Read More