Ajay Maharaj Baraskar | मनोज जरांगेंवर आरोप करणे अजय महाराज बारसकरांना पडले महागात, ‘प्रहार’मधून झाली हकालपट्टी

Ajay Maharaj Baraskar vs Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण (Maratha Reservation) लढवय्ये मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे गंभीर आरोप करणे अजय महाराज बारसकर (Ajay Maharaj Baraskar) यांना महागात पडले आहे. बारसकर यांची प्रहार पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलन आणि मराठा आरक्षण विषयी कोणीही भूमिका मांडू नये असे आदेश आमदार बच्चू कडू यांची प्रहार कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

अजय महाराज बारसकर (Ajay Maharaj Baraskar) काय म्हणाले?
दरम्यान, मी गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहे. मधल्या काळात अंतरवालीत घटना घडली आणि मी आंदोलन लढ्यात पुन्हा सहभागी झालो. मराठवाड्यात ओबीसी नोंदींसाठी मी देखील अनेक वर्षांपासून काम करतोय. त्यामुळे जरांगे पाटील यांच्यासोबत कृतीत सहभागी झालो. मी यापूर्वी कधीच माध्यमासमोर आलो नाही. मी जरांगे यांना पाटील म्हणणार नाही. कारण जरांगेकडे पाटील पदासाठी काही नाही. तो हेकेखोर आहे, कोणत्याही शब्दावर अडून राहायचा. आमचा समाज खूप भोळा आहे, असे अजय महाराज बारसकर म्हणाले.

23 डिसेंबरला गुप्त मिटिंग काहींसोबत यांनी केली. मी साक्षी आहे. रांजन गाव गणपती येथे उच्च पदस्थ अधिकारी यांच्यासोबत गुप्त मीटिंग केली. लोणावळा, वाशी येथे ही समाजाला वगळून मीटिंग केली. वाशी आंदोलन इथंवर मी आंदोलक म्हणून सहभागी होतो, मात्र त्यांच्या मीटिंगमुळे मला आक्षेप होता. जरांगेला काडीची अक्कल नाही. पंधरा मिनिटात शासन निर्णय आणि अधिसूचना द्या म्हणे. अर्धवट ज्ञान बेक्कार असतं म्हणतो पण स्वतःचं काय. सगळ्या अधिकारी यांच्यासोबत हा मिटिंग घेत होता, असा आरोपही त्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार कुणी दिला? राज ठाकरेंनी मराठा समाजाला जागृत राहण्याचा इशारा दिला

पृथ्वीराज चव्हाणांनी दिलेले १६ टक्के आरक्षण १० टक्क्यांवर कसे आले? Devendra Fadnavis म्हणाले…

“उद्धव ठाकरेंच्या कानठाळ्या…”, मराठ्यांना आरक्षण दिल्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल