पहिल्या टी-२० मॅचपूर्वी टीम इंडियाला धक्का; ‘स्टार’ खेळाडू पडला मालिकेबाहेर!

कोलकाता – अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे कोलकाता इथं वेस्ट इंडिजविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतून बाहेर पडला आहे. वॉशिंग्टनच्या जागी कुलदीप यादवची नियुक्ती करण्यात आली असल्याचं भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं काल सांगितलं.

अहमदाबादमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना सुंदरचा डाव्या हाताचा स्नायू दुखावला होता. उभय संघांदरम्यान 20 षटकांची क्रिकेट मालिका कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर उद्यापासून सुरू होणार आहे.

यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार केएल राहुल आणि अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल यांना या टी-२० मालिकेतून वगळण्यात आले आहे. या दोन खेळाडूंच्या अनुपस्थितीत ऋतुराज गायकवाड आणि दीपक हुडा यांचा बदली संघात समावेश करण्यात आला आहे.

भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, अवेश खान हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड, दीपक हुड्डा.