… तर तुमच्या पोटात दुखायचं कारण काय? तृप्ती देसाईंची गौतमी पाटीलवरुन इंदोरीकर महाराजांवर टीका 

Pune :  ‘सबसे कातिल गौतमी पाटील’ (Gautami Patil), ‘गौतमीकी झलक सबसे अलग’….. सध्या लावणी म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा नाव समोर येतं ते म्हणजे गौतमी पाटीलचं. अश्लील डान्समुळे चर्चेत आलेल्या गौतमीच्या नृत्यानं संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलयं. गौतमीची क्रेझ इतकी आहे की आता मोठमोठ्या कलाकारांचे कार्यक्रम सोडून प्रेक्षक गौतमीचे कार्यक्रम पाहण्यास गर्दी करतात.

दरम्यान, काहीजण तिच्या बाजूने बोलतात तर तिचाअनेकांनी विरोध देखील केला. आता यात कीर्तनकार इंदुरीकर महाराजांची (Indurikar Maharaj) भर पडली आहे.कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी बीड जिल्ह्यातील एका कार्यक्रमात नृत्यांगना गौतमी पाटील हिचं नाव न घेता टीका केली.    तीन गाण्यासाठी तीन लाख मोजण्याची तयारी पण आम्हाला टाळ वाजवूनही काही मिळत नाही असं वक्तव्य इंदुरीकरांनी केलं आहे.आष्टी तालुक्यातील तवलवाडी येथे  इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन ठेवण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, याच मुद्द्यावरून आता भूमाता ब्रिगेडच्या सर्वेसर्वा तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी महाराजांवर टीकास्त्र सोडले आहे.

आता एखादी महिला लावणी सम्राज्ञी म्हणून समोर आली तर तिच्या लाखो रुपयांवर तुम्ही बोलता. तुम्ही पाच हजार रुपये घेत नाही, तुम्ही किती पैसे घेता, हे सर्वांना माहिती आहे. राजकारणी तुमच्यावर पांघरुण का घालतात हे सर्वांना माहिती आहे, असं तृप्ती देसाई म्हणाल्या. त्यामुळं एखादी महिला पुढं चालली की त्याविषयी बोलून स्वत:चं महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करता. फक्त पैसा तुम्हीच कमवायचा का, असा सवाल तृप्ती देसाई यांनी केला आहे.

गौतमी पाटील बोलावून स्वत:हून मानधन देत असतील तर तुमच्या पोटात दुखायचं कारण काय आहे. तिला चांगलं बोलेल, वाईट बोलेल पण तुम्ही बोललात म्हणजे महिला पुढं गेलेली तुम्हाला वाईट वाटलं आहे, असं तृप्ती देसाई म्हणाल्या.