Crime News : मध्यरात्री भेटायला आलेल्या मुलीचा विनयभंग, आरोपीस तीन वर्षांचा कारावास

Vardha crime news : वर्ध्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला अखेर न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. आरोपी तुषार लंकेश पेढे (रा. मार्डा) याला तीन वर्षे सश्रम कारावास आणि दीड हजार रुपये दंडाची शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आशुतोष एन. करमरकर यांनी ठोठावली. लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार,  या गुन्ह्यातील आरोपी हा पीडितेच्या  घरी शेतात कामासाठी जात असल्याने पीडितेची ओळख होती. त्यामुळे कधी कधी ती फोनवरही त्याच्यासोबत बोलत होती. १७ जुलै २०२० रोजी आरोपीने पीडितेच्या वडिलांच्या फोनवर मेसेज करून १८ जुलै रोजी रात्री बारा वाजता गावातील शाळेत भेटण्यासाठी बोलाविले होते; पण पीडिता ही आरोपीला भेटण्यास गेली नव्हती. त्यामुळे आरोपीने पीडितेला तू मला भेटण्यास आली नाही तर तुझे फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

पीडिता घाबरून १९ जुलै २०२० रोजी मध्यरात्री तीन वाजता आरोपीला भेटण्यासाठी गेली असता आरोपीने तिच्याशी असभ्य वर्तन करून तेथून निघून गेला. घडलेली घटना पीडितेने तिच्या आई- वडिलांना सांगितली. याप्रकरणी सिंदी रेल्वे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. प्रकरणाचा तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रिती आडे यांनी करून आरोपीविरुद्ध पुरावा उपलब्ध करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीला तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

https://youtu.be/fTZWF6rmkXs?si=5iYeROzfJ4iPq1vf

महत्वाच्या बातम्या-

Israel : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री इस्रायलमधल्या युद्धात अडकली; तळघरात लपली आणि संपर्कही तुटला

Israel : पॅलेस्टीनच्या विरोधात इस्रायलने केली युद्धाची घोषणा; स्वोर्ड्स ऑफ आयर्न मोहिमेद्वारे शत्रूला घडवणार अद्दल

विश्रांतवाडी येथील उड्डाणपुलाला एस्टिमेट कमिटीत मान्यता; Jagdish Mulik यांच्या पाठपुराव्याला यश