Uday Samant | चार पावलं मागे आलो, याचा अर्थ भविष्यात…; नारायण राणेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सामंत काय म्हणाले?

Uday Samant | रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीतून केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपाने त्यांची बारावी यादी जाहीर करत नारायण राणेंच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. मतदारसंघातून शिवसेनेचे नेते किरण सामंत यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा होती. विशेषत: शिवसेना नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी आपले बंधू किरण सामंत यांच्यासाठी जोर लावला होता. पण, आता नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने उदय सामंत यांनी सामोपचाराची भूमिका घेतली आहे.

उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काही गोष्टींमध्ये चार पावले मागे आलो याचा अर्थ असा नाही की आम्ही भविष्यात पुढे काही करणार नाही. खासदार किरण सामंत यांना खासदार करायचं आहेच. महायुतीमध्ये तेढ निर्माण होऊ नये, यासाठी माघार घेत आहे, असं उदय सामंत म्हणाले आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Amol Kolhe | ‘आमच्या गावासाठी पाच वर्षांत काय केले?’ करंदी ग्रामस्थांचा अमोल कोल्हेंना थेट सवाल

Murlidhar Mohol | मनसेच्या साथीनं महायुतीचे मताधिक्य वाढणार!, मुरलीधर मोहोळ यांनी घेतली अमित ठाकरेंची भेट

Narendra Modi | मोदीजींची विकेट काढायला विरोधकांकडे ना बॉलर ना बॅट्समन, शिंदेंचा विरोधकांवर घणाघात