Narayan Rane | उदय आणि किरण सामतांचा नारायण राणेंना जाहीर पाठींबा, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर स्पष्ट केली भूमिका

Narayan Rane | लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी तसेच वंचित बहुजन आघाडी अशी राज्यात लढत होत असून अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. दरम्यान रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीतून केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane)  यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपाने त्यांची बारावी यादी जाहीर करत नारायण राणेंच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे.

दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. महायुतीमध्ये तेढ निर्माण होऊ देणार नाही. नारायण राणे उमेदवार असले तरी त्यांचे काम करणार असं ते म्हणाले आहेत. तसेच किरण सामंत यांनी आज ते नारायण राणे यांना समर्थन देतीत असे जाहीर केले. पत्रकार परीषद घेत यांनी आपली भुमिका स्पष्ट केली.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे नेते किरण सामंत यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा होती. मात्र किरण सामंत यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे नरेंद्र मोदीजी पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी व अब की बार ४०० पारसाठी रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातून माघार घेत असल्याचे म्हटले होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Amol Kolhe | ‘आमच्या गावासाठी पाच वर्षांत काय केले?’ करंदी ग्रामस्थांचा अमोल कोल्हेंना थेट सवाल

Murlidhar Mohol | मनसेच्या साथीनं महायुतीचे मताधिक्य वाढणार!, मुरलीधर मोहोळ यांनी घेतली अमित ठाकरेंची भेट

Narendra Modi | मोदीजींची विकेट काढायला विरोधकांकडे ना बॉलर ना बॅट्समन, शिंदेंचा विरोधकांवर घणाघात