Uddhav Thackeray | ही लढाई आता…वाघ विरुद्ध लांडगे, निष्ठावंत विरुद्ध गद्दार अशी आहे  

Uddhav Thackeray | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत असून धाराशीव (Dharashiv) लोकसभेतील कळंब येथील ‘जनसंवाद’ मेळाव्यातशिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विरोधकांना चांगलेच फैलावर घेतले आहे. ही लढाई आता…वाघ विरुद्ध लांडगे, इमानदार विरुद्ध बेईमानदार, निष्ठावंत विरुद्ध गद्दार अशी आहे! असे त्यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले, महाराष्ट्रातल्या भाजपच्या खासदारांनी कधीतरी मोदींसमोर संसदेत महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचे प्रश्न मांडले का?न्यायदानामध्येही भाजपची काळी मांजरं बसली असतील, तर आम्ही न्याय मागायचा कुणाकडे?देशाचे गृहमंत्री मणिपूरसारख्या मुद्द्यावर शेपूट घालून बसतात आणि महाराष्ट्रात फणा काढायला येतात. अशी टीका देखील त्यांनी केली.

जर शिवसेनेने भाजपला खांद्यावर घेतलं नसतं, तर आज चार खांदेसुद्धा मिळाले नसते.देशातली सगळी राज्य समृद्ध झाली पाहिजेत, तरच भारतमाता की जय आपण बोलू शकतो. ह्याची जाणीव आम्हाला आहे. पण तुमच्या मनात महाराष्ट्रद्वेष का?असा थेट सवालही त्यांनी केलाय.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Sunil Shelke | …अन्यथा मी राज्यभर सांगणार की पवार साहेबांनी माझ्यावर खोटे आरोप केले, सुनिल शेळकेंचा इशारा

Amit Shah | अमित शाह हे शेपूट घालणारे गृहमंत्री; उद्धव ठाकरे यांची सडकून टीका

Sharad Pawar | पक्ष स्थापनेपासून आम्ही विचारधारा कधीच बदलली नाही; शरद पवार यांचा दावा