Safaraz Khan | इंग्लंडविरुद्ध अर्धशतक ठोकल्यानंतर सरफराज खानने पत्नीला दिले फ्लाइंग किस, रिऍक्शन व्हायरल

Safaraz Khan | टीम इंडियाचा उदयोन्मुख स्टार सरफराज खानने धर्मशाला कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी तुफानी शैलीत आपले अर्धशतक पूर्ण केले. सरफराजने अवघ्या 55 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या धमाकेदार खेळीनंतर त्याने स्टेडियममध्ये बसलेल्या त्याच्या पत्नीकडे पाहिले आणि फ्लाइंग किस दिला. सरफराज खानने भर मैदानावर पत्नीवर प्रेम दाखवत चाहत्यांची मने जिंकली. पदार्पणाच्या सामन्यातही सर्फराजने अर्धशतक ठोकून पत्नीवर प्रेमाचा वर्षाव केला होता.

मात्र, सर्फराज खानने (Safaraz Khan) अर्धशतक पूर्ण केल्यानंतर काही वेळातच त्याची विकेट गमावली. सरफराजने 60 चेंडूत 56 धावांची खेळी खेळली, ज्यात त्याने 8 चौकार आणि 1 षटकारही लगावला. या दमदार फलंदाजीसोबतच सरफराजने या मालिकेतील तिसरे अर्धशतकही पूर्ण केले. सरफराजने पदार्पणाच्या कसोटीच्या दोन्ही डावात अर्धशतके झळकावून आपल्या करिअरची दमदार सुरुवात केली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Sunil Shelke | …अन्यथा मी राज्यभर सांगणार की पवार साहेबांनी माझ्यावर खोटे आरोप केले, सुनिल शेळकेंचा इशारा

Amit Shah | अमित शाह हे शेपूट घालणारे गृहमंत्री; उद्धव ठाकरे यांची सडकून टीका

Sharad Pawar | पक्ष स्थापनेपासून आम्ही विचारधारा कधीच बदलली नाही; शरद पवार यांचा दावा