कधी कधी माझे वडीलच मी बेशुद्ध होईपर्यंत…; आता उर्फी जावेदने केला वडिलांबद्दलच केला गंभीर खुलासा

मुंबई- सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद (Uorfi Javed) केवळ तिच्या ऑफबीट फॅशनसाठीच नाही तर तिच्या बिनधास्त स्वभावासाठीही प्रसिद्ध आहे. ती तिच्या आयुष्याशी निगडीत कोणतेही सत्य लपवत नाही. अशातच आता तिने अलीकडेच तिच्या भूतकाळावर प्रकाश टाकला आहे. नुकत्याच एका पॉडकास्ट मुलाखतीत उर्फीने तिच्यासोबत घडलेले काही किस्से सांगितले. वयाच्या 17 व्या वर्षीच ती तिच्या बहिणींसोबत मिळून घरातून पळून गेली होती.

युट्यूबर रणवीर इलाहाबादियाच्या पॉडकास्ट मुलाखतीत उर्फीने तिच्या वडिलांकडून झालेल्या मारहाणीचा उल्लेख केला. तिने सांगितलं, “माझे वडील जुन्या विचारसरणीचे आहेत आणि माझ्या आईचं फार कमी वयात लग्न झालं होतं. मला लहानपणी माझे वडील खूप मारायचे. इतर मुलींपेक्षा मी तेव्हा जास्त आत्मविश्वासू आणि थोडी वेगळी होती. कधी कधी वडील मला इतकं मारायचे की मी बेशुद्ध व्हायची. माझ्या आईचा राग ते अनेकदा माझ्यावर काढायचे. अखेर एका क्षणाला असं वाटलं की पुरे आता. यापुढे आणखी सहन होणार नाही.” असेही ती म्हणाली.