‘जेवायला बोलावले गांव, आणि जेवणात वडापाव…म्हणे आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद…’

मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut Press) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील आणि राज्यातील भाजपवर हल्लाबोल (Raut Criticized BJP) केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणून आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्याविरोधातील सर्व प्रकरणे खोटी असल्याचा दावा संजय राऊत यांनी यावेळी केला.

दरम्यान, राऊत यांच्या पत्रकार परिषदेत अनेक गौप्यस्फोट होतील अशी आशा तमाम मराठी जनतेला होती मात्र या पत्रकार परिषदेत करण्यात आलेले आरोप पाहिल्यानंतर आता भाजप नेते राऊत यांची खिल्ली उडवत टीका करू लागले आहेत. पुण्यातील भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकर आणि नगरसेवक दीपक पोटे यांनी देखील याबाबत फेसबुक पोस्ट केल्या असून संजय राऊत यांची खिल्ली उडवली आहे.

बिडकर म्हाणाले, खोटेनाटे आरोप करताना… शिवराळ बोलताना… जळफळाट होताना…’घाम’ फुटणारच की ! खोदा पहाड, निकला चुहा ! असं बिडकर यांनी म्हटले आहे. तर दुसऱ्या बाजूला पोटे म्हणाले, खूप भीती वाटत आहे …कसली पत्रकार परिषद झाली बाप रे ……जेवायला बोलावले गांव, आणि जेवणात वडापाव…आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद… असं म्हणत त्यांनी खिल्ली उडवली आहे.