पंजाबमध्ये शिवसेनेच्या खलिस्तानविरोधी मोर्चात राडा; तुफान दगडफेक

पटियाला- शिवसेनेने (shivsena) पंजाबमधील(panjab)  पटियाला  (Patiala) येथे खलिस्तानविरोधी मोर्चा (Anti-Khalistan rally) काढला. यादरम्यान परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आणि अनेक शीख संघटना (Sikh Association) आणि हिंदू कार्यकर्ते (Hindu activists) आमनेसामने आले. परिस्थिती अशी बनली की, शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांना खूप संघर्ष करावा लागला. या वेळी दोन्ही बाजूंनी तुफानी दगडफेकही झाली.

पटियाला येथे शिवसेनेचे पंजाब कार्याध्यक्ष हरीश सिंगला  (Shiv Sena’s Punjab working president Harish Singh) यांच्या देखरेखीखाली आर्य समाज चौकातून  (Arya Samaj Chowk)  मोर्चा निघाला. खलिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत शिवसैनिक बाहेर पडले. मिळालेल्या माहितीनुसार, पतियाळा येथील आर्य समाज चौकात हा गोंधळ झाला. शिवसैनिकांनी खलिस्तानी विरोधी मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. शिवसैनिक ‘खलिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा देत होते. त्यानंतर शीख समाजातील काही तरुण रस्त्यावर तलावारी घेऊन उतरले. पाहता पाहता अचानक दगडफेक सुरु झाली.

यावेळी दोन्ही गटांचा विरोध वाढल्याने पोलिसांनी दोन्ही बाजूंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र परिस्थिती अनियंत्रित झाली. दोन्ही बाजूंनी जोरदार दगडफेक झाली आणि गोळीबारही झाला, यामध्ये एका गटाचा नेता जखमी झाला. या संपूर्ण प्रकरणावर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान(Punjab Chief Minister Bhagwant Mann)  यांनी ट्विट केले की, पटियाला येथील संघर्षाची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मी डीजीपीशी बोललो आहे, परिसरात शांतता प्रस्थापित झाली आहे. आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि कोणालाही राज्यात अशांतता निर्माण करू देणार नाही. पंजाबची शांतता आणि सौहार्दाला अत्यंत महत्त्व आहे.असं ते म्हणाले.